लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार नागरिकांना फक्त प्रलोभन देवून दिशाभूल शासन करीत आहे. सरकारमुळे शेतकरी, शेतमजूर, व्यापारी व सरकारी नोकरवर्गही वैतागला आहे. जुन्या काळातील कामे आम्हीच केले असल्याचे खोटे बोलून समोर येण्याचा प्रयत्न करीत आहे. काँग्रेसच्या काळातील जुन्या योजनांची नाव बदलून नवीन सांगून उदो-उदो करीत असून भाजप सरकारचे दिशाभूल शासन असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सभापती पी.जी.कटरे यांनी केले.ग्राम बेरडीपार येथे कॉँग्रेसच्या बुथ समन्वय सभेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सचिव डॉ. योगेंद्र भगत, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष राधेलाल पटले, रमेश पटले, हुपराज जमईवार, सुशीपाल पटले, चंद्रकिशोर मिश्रा, गोविंद ठाकरे, कोटांगले, निर्मला चौधरी उपस्थित होते.पुढे बोलताना कटरे यांनी, भाजपा सरकार उद्योगपती, कारखानदारांची सरकार आहे. सामान्य जनता होरपळून जीवन जगत असून हे आता काँग्रेसचे कार्यकर्ते सहन करणार नाही. भाजप सरकारचा निषेध प्रत्येक गावात जाऊन सुरू केला आहे. आपल्या हक्कासाठी जनतेने समोर यावे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे मत व्यक्त केले.यावेळी बेरडीपार येथील व्यंकट चौधरी, निर्मला चौधरी, पुरणलाल ठाकरे, मुन्ना चौधरी, मोहनलाल पटले यांनी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला. संचालन हभप गणराज पटले यांनी केले. आभार सुशीपाल पटले यांनी मानले.
भाजप सरकारचे दिशाभूल शासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2018 11:35 PM
केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार नागरिकांना फक्त प्रलोभन देवून दिशाभूल शासन करीत आहे. सरकारमुळे शेतकरी, शेतमजूर, व्यापारी व सरकारी नोकरवर्गही वैतागला आहे. जुन्या काळातील कामे आम्हीच केले असल्याचे खोटे बोलून समोर येण्याचा प्रयत्न करीत आहे.
ठळक मुद्देपी.जी. कटरे : बेरडीपार येथे बुथ समन्वय सभा