भाजपाध्यक्ष पटले : ३६ कार्यकर्त्यांनी केले रक्तदान, देवरी येथे ७० कार्यकर्त्यांचे रक्तदानगोंदिया : जिल्ह्यात ठिकठिकाणी भाजपाचा स्थापना दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. गेल्या ३६ वर्षात कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण कामांमुळे आज भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. कार्यकर्त्यांच्या संघर्षातूनच भाजपा देशात व राज्यात सत्तेवर असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी केले.ते काले खॉ चौकात आयोजित भाजपच्या ३६ व्या स्थापनादिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी प्रामुख्याने ज्येष्ठ नेते राधेशाम अग्रवाल, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, भाजप महिला मोर्चा अध्यक्ष भावना कदम, संजय कुलकर्णी, जयंत शुक्ला, शहर अध्यक्ष सुनील केलनका, भरत क्षत्रीय, दीपक कदम, न.प. बांधकाम सभापती बंटी पंचबुद्धे, नगरसेविका प्रमिला सिंद्रामे आदी उपस्थित होते. या आधी सकाळी ९ वाजता जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या हस्ते भाजपा जिल्हा कार्यालयात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून भाजपच्या झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले व मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे जिल्हाध्यक्ष पटले यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पंचायत समिती स्तरावर व शहरातील प्रभागात स्थापना दिन साजरा करुन ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात ३६ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान करुन स्थापना दिवस उत्साहात साजरा केला. सर्वप्रथम जिल्हाध्यक्ष हेमंत टपले यांनी रक्तदान केले. देवरी : नगरासोबत तालुक्यातील पंचायत समिती क्षेत्रानिहाय पक्ष ध्वजारोहण करुन मोठ्या उत्साहात भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचा स्थापना दिवस साजरा केला. भाजपा कार्यालयात आयोजीत मुख्य कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तालुक्यातील १० पंचायत समिती क्षेत्रात ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्जवारोहणानंतर कार्यकर्ता सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अल्पसंख्यक आघाडीचे अध्यक्ष अल्ताफ हमीद, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सविता पुराम, तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार, श्रीकृष्ण हुकरे, सुकचंद राऊत, पं.स. सभापती देवकी मरई, महामंत्री प्रवीण दहीकर, विनोद भेंडारकर, अनिल येरणे, सर्व नगर पंचायत सदस्य युवा मोर्चा अध्यक्ष राजू शाहू, कुलदीप लांजेवार, इंदू जितसिंग भाटीया तथा अनेक पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ७० कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. गोरेगाव : तालुक्यातील गणखैरा पंचायत समिती क्षेत्राकडून चिचगाव येथे स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. माजी जिल्हा परिषद सभपती मोरेश्वर कटरे यांच्या अध्यक्षतेत महिला आघाडी तालुकाध्यक्ष चित्रकला चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. बाजार समिती संचालक डॉ. के.टी. कटरे, भिकराज ठाकरे, सरपंच जगदीश बोपचे, उपसरपंच कृष्णकुमार भावे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अनंत ठाकरे, योगेश (बबलू) चौधरी, शालीकराम कोल्हे, दीपक रहांगडाले, जागेश्वर रहांगडाले, रामाजी वाघाडे, होलराज बघेले, राजेश सोनवाने व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पक्ष साधारण कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारी पार्टी असल्याचे मत पाहुण्यांनी व्यक्त केले. इसापूर : झरपडा येथे स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ईटखेडा जि.प. सदस्य मंदा कुंभरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सदस्य जयश्री पंधरे, कृउबास संचालिका कुंदा डोंगरवार, सरपंच नामदेव परशुरामकर, डॉ. गजानन डोंगरवार, तालुका महामंत्री डॉ. नाजूक कुंभरे, होमराज ठाकरे, धाबेटेकडीचे उपसरपंच नूतन सोनवाने, यादोराव गोठे, केशवराव गिऱ्हेपुंज़े, माधोराव मस्के, नाजूक लांज़ेवार, सुखराम शेंद्रे, शंकर राऊत, मधू मस्के, लता मस्के, स्वाती डोंगरवार व इतर मान्यवर उपस्थित होते.सालेकसा : येथील भात गिरणी स्थित भाजपा कार्यालयात सकाळी भाजपाचा झेंडा फडकविण्यात आला. प्रदेश कार्यकारिणी सदस्य राकेश शर्मा यांच्या अध्यक्षतेत भाजपा तालुकाध्यक्ष परसराम फुंडे यांच्या हस्ते ध्जवारोहण करण्यात आले. यावेळी माजी सभापती बाबुलाल उपराडे, महामंत्री राजेंद्र बडोले, इसराम बहेकार, अजय डोये, राजू बोपचे, कुणाल येणारे, दिनेश वशिष्ट, बबलू भाटीया, संदीप डेकाटे, गणेश फरकुंडे, धीरज ब्राह्मणकर, मनोज इळपाते आदी उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कार्यकर्त्यांच्या संघर्षातूनच भाजपाची सत्ता
By admin | Published: April 10, 2016 2:01 AM