शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार? मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक; राऊत म्हणाले, 'विषय गंभीर'
2
IND vs NZ : ३६ वर्षांचा दुष्काळ संपला! टीम इंडियाला न्यूझीलंडनं पाजलं पराभवाचं पाणी
3
“लाडकी बहीण योजनेवरुन विरोधक फसवायचे काम करतायत, पण...”; अजितदादा गटातील नेते थेट बोलले
4
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याचं अमित शाहांच कारस्थान, संजय राऊत यांचा सनसनाटी आरोप
5
रस्त्याच्या कडेला मजुरांच्या बाजूला झोपला अभिनेता; नेटकरी ट्रोल करत म्हणाले, 'व्हिडिओसाठी...'
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येप्रकरणातील आरोपींच्या फोनमध्ये झिशान यांचा फोटो, स्नॅपचॅटवर केलं प्लॅनिंग
7
सुप्रसिद्ध अभिनेता किच्चा सुदीपच्या आईचं निधन, ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम धर्मगुरूंची भेट, २ तास चर्चा; २ दिवसांत निर्णय? चर्चांना उधाण
9
मनोज जरांगेंनी सुद्धा निवडणूक आजमवायला हरकत नाही; छगन भुजबळांनी दिला हा तर्क
10
“तुला लंकेंनी पाठवले का?”; भरसभेत अजित पवार संतापले; कार्यकर्त्याला चांगलेच सुनावले
11
मोठा उलटफेर! IPL 2025 जिओ सिनेमावर दिसणार नाही? डिस्ने हॉटस्टार पुन्हा प्रक्षेपण करण्याची शक्यता
12
बिग बॉसनंतर कोणी 'बच्चा' भेटलंय का? सूरज लाजत म्हणाला- "लय पोरींचे मॅसेज येतात पण..."
13
अमेरिकेची गोपनीय कागदपत्रे लीक; इस्रायल कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करण्याची शक्यता
14
लाहोरची वधू, जौनपूरचा वर, भाजपा नेत्याच्या मुलाचा पाकिस्तानमधील तरुणीशी ऑनलाईन निकाह
15
धक्कादायक खुलासा! वृक्ष, जमीन, समुद्राने कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेणे थांबविले; कोणत्या संकटाची चाहूल...
16
Ranji Trophy : मुंबई विरुद्ध पुणेकराची बॅट तळपली; Ruturaj Gaikwad ची दमदार सेंच्युरी!
17
“महायुती CMपदाचा चेहरा जाहीर करायला घाबरते, जनतेच्या पैशावर भाजपाचा प्रचार”; काँग्रेसची टीका
18
एकीकडे सलमान खानला धमक्या, तिकडे अर्पिता खानने विकला बांद्रामधला कोटींचा फ्लॅट
19
IND vs NZ : बुमराहचा भेदक मारा, टॉम लॅथमच्या पदरी भोपळा; सेटअप करून अशी घेतली विकेट (VIDEO)
20
गाढ झोपेत असताना काळाचा घाला! राजस्थानमध्ये लक्झरी बस-टेम्पोमध्ये भीषण अपघात; ८ मुलांसह ११ जणांचा मृत्यू

सालेकसा तालुक्यात भाजपची कंबर मोडली

By admin | Published: July 07, 2015 12:46 AM

गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपलीच सत्ता कायम राहील या भ्रमात असलेल्या भारतीय जनता पक्षाला सालेकसा तालुक्यात मतदारांनी धडा शिकविलेल्याचे दिसून येत आहे.

राकाँ, काँग्रेसने केले किले ध्वस्त : बाहेरचे उमेदवार ठरले आत्मघाती विजय मानकर सालेकसागल्लीपासून दिल्लीपर्यंत आपलीच सत्ता कायम राहील या भ्रमात असलेल्या भारतीय जनता पक्षाला सालेकसा तालुक्यात मतदारांनी धडा शिकविलेल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात जि.प.च्या चार जागांपैकी फक्त एक आणि पं.स.च्या आठ जागांपैकी तीनच जागा भाजपच्या खिशात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातूनच नव्हे तर तालुक्यातून सुद्धा भाजप सत्तेबाहेर झाली आहे.मागील पंचवार्षिकात तालुक्यात जि.प.मध्ये तीन जागा होते. मात्र यावेळी फक्त एक जागा ती म्हणजेच आमगाव खुर्दची कायम राहीली आहे. तर शुन्यावर असलेली काँग्रेस दोन जागेवर झालीया आणि कारुटोला जिंकून आली. कारुटोला काँग्रेसने परत मिळविली तर झालीया येथे काँग्रेस ने जबरदस्त एंट्री केली आहे. येथे दोन वेळा भाजप तर एक वेळा राष्ट्रवादी निवडून आली होती. या क्षेत्रात काँग़्रेसचा नाव घेणारा सुद्धा कोणी दिसत नव्हता. मात्र यावेळी मतदारांनी येथे बाहेरुन आलेल्या भाजप आणि राकाँ दोन्ही पक्षाच्या उमेदवाराला सपेश्ल नकारले. पिपरीया जि.प.क्षेत्रावर १५ वर्षापासून सतत भाजपचा राज होता. मात्र या ठिकाणी जन शक्तीवर धनशक्ती भारी पडली. आणि भाजप भुईसपाट झाली. यावेळी येथे भाजपचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहीला. या ठिकाणी ही मतदारांनी बाहेरच्या उमेदवारांना नकारत स्थाानिकाला महत्व दिले. परंतु राष्ट्रवादीच्या दुर्गा तिराले यांची धनशक्ती आणि भाजपचे नाराज कार्यकर्ते यांची साथ मिळाल्यामुळे काँग्रेसचे स्थानिक उमेदवार ओमप्रकाश लिल्हारे चुरशीच्या लढतीत पराभूत झाले.सालेकसा पंचायत समितीवर एकछत्र राज करणारा भाजप पक्ष यावेळी सत्तेतून बाहेर झालेला दिसत आहे. मागील निवडणुकीत आठ पैकी सहा जागा जिंकत पूर्ण बहुमत घेत सत्ता प्राप्त केली होती. यावेळी फक्त जुन्या तीन जागा वाचवित तीन जागा गमावल्या आहेत. यात आमगाव खुर्द कावराबांध आणि झालीया भाजपकडे कायम असून पिपरीया टोयागोंदी आणि कारुटोला पं.स. मध्ये मनोज विश्वकर्मा यांचा पुनच विचार केला नाही. ते उपसभापती राहीले असून त्यांचा जनसंपर्क वाढला होता. परंतु उमेदवारी न दिल्याने त्यांनी भाजपशी घटस्फोट केला आणि आपल्या पत्नीला घेवून राष्ट्रवादीच्या मांडव्यात गेले. राष्ट्रवादी ने राजकुमारी विश्वकर्मा यांना टोयागोंदीची उमेदवारी दिली. त्यामुळे राष्ट्रवादीने पं.स. बरोबरच जि.प. जिंकण्यातही बाजी मारली. पिपरीया क्षेत्रातच भाजपसाठी मोठा धक्का दायक ठरला. दुसरीकडे काँग्रेसने सोनपुरी आणि लोहारा आपल्याकडे कायम ठेवत पिपरीया आणि कारुटोला भाजपकडून हिसकावून घेतली. आठ पैकी चार जागा जिंकलेल्या काँग्रेसला पूर्ण बहुमत नसला तरी सभापती पद काँग्रेसकडेच राहील तर उपसभापती पद भाजपला की राष्ट्रवादीला देत सत्ता समीकरण कसे बनवतील ते पहावे लागेल. मात्र भाजपला धडा मिळाला एवढे नक्की. सालेकसा आणि देवरी या तालुक्यात आतापर्यंत आतापर्यंत बहुतांश वेळा भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. हे मतदार संघ ज्या लोकसभा क्षेत्रात येतात त्या देवरीतही भाजपाचेच खासदार आहेत. आमदार म्हणून संजय पुराम यांनीही गेल्या सात महिन्यात आपली छाप पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपचे खासदार आणि आमदार हे मतदारांवरील विश्वास कायम राखण्यात कुठेतरी कमी पडल्याचे दिसून येत आहे.