शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

गोंदिया जिल्ह्यातील धानाच्या कटोऱ्यात पिकतेय काळे सोने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 3:05 PM

गोंदिया जिल्ह्यातील एका प्रगतीशिल शेतकऱ्याने यावर मात केली असून केवळ पाऊण एकर शेतीत लाखो पोयरटन या ब्लाक धानाची लागवड करुन केवळ १५५ दिवसात १ लाख रुपयांचे उत्पन्न घेवून शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

ठळक मुद्देपाऊण एकरात लाखाचे उत्पन्न एसआरटी पध्दतीची मदत

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. खते, बियाणे आणि लागवड खर्चात वाढ होत असल्याने शेती म्हणजे तोट्याचा सौदा होत चालली आहे. मात्र

अशोक खुणे रा.नवेगाबांध, ता.अर्जुनी असे त्या प्रगतीशिल शेतकऱ्याचे नाव आहे.खुणे सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आपल्या भाषणात शेतकऱ्यांना मार्गदर्शन नेहमी कृषी क्षेत्रातील यशस्वी प्रयोगांची कॉपी करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देतात. त्यांचा हा सल्ला आता शेतकरी सुध्दा आत्मसात करीत असल्याचे चित्र आहे. गोंदिया जिल्हा धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच या जिल्ह्याला धानाचा कटोरा असे म्हटले जाते. मात्र आता या जिल्ह्यातील शेतकरी ब्लॉक राईसची लागवड करुन उत्पन्न घेत आहे. त्यामुळे धानाच्या कटोऱ्यात आता काळे सोने पिकत असल्याचे दिलासा दायक चित्र आहे. खुणे यांची नवेगाव येथे शेती आहे. त्यांनी एक एकर शेतीत यंदा विविध देशी आणि बाहेरच्या प्रजातीच्या धानाची लागवड केली. तर पाऊन एकर क्षेत्रात मनीपूर येथील लाखो पोयरटन या ब्लाक धानाची लागवड केली. हा धान १५५ दिवसात येणार असून याचे एकरी १४ ते १५ क्विंटल उत्पादन होते. या धानाची लागवड करताना त्यांनी सगुणा राईस टेक्नालॉजी (एसआरटी) पध्दतीचा अवलंब केला. यात कुठलेही रासायनिक खते अथवा किटकनाशकांचा वापर केला नाही. पूर्णपणे जैविक शेती केली. त्यामुळे यासाठी लागवड खर्च सुध्दा कमी आला. यंदा त्यांनी प्रयोग म्हणून केवळ पाऊन एकर शेतीत या ब्लाक राईसची लागवड केली. यातून त्यांना १ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. लाखो हो पोयरटन, हिरानखी या तांदळाला (ब्लाक राईस) प्रती किलो ३०० ते ४०० रुपये दर असून या तांदळाला मागणी सुध्दा आहे. खुणे यांनी गावात ३५० रुपये किलो प्रमाणे या तांदळाची विक्री केली. याच धानाप्रमाणे ब्लाक राईसच्या इतर प्रजातींची सुध्दा लागवड केली आहे. एकीकडे वाढत्या लागवड खर्चामुळे शेती तोट्याची होत चालली असल्याची ओरड असताना शेतीत नवीन प्रयोग व त्याला तंत्रज्ञानाची जोड देवून खुणे यांच्यासारखे शेतकरी भरघोस उत्पन्न घेवून शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण करीत आहेत. विशेष म्हणजे विदर्भात ब्लाक राईसचे उत्पादन होत नाही असा शेतकऱ्यांचा समज होता. मात्र तो सुध्दा आत्तापूर्णपणे दूर झाला आहे. तर रायगड जिल्ह्यातील कृषीरत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी भडसावळे यांच्या एसआरटी लागवड पध्दतीमुळे उत्पादनात वाढ करण्यास मदत होत आहे.काय आहे एसआरटीधानाची लागवड करताना त्याचे पºहे न टाकता गादी वाफे तयार करुन त्यात धान पेरले जाते. यामुळे धानाची चांगली वाढ होते.त्यामुळेच या पध्दतीला सगुणा राईस टेक्नालॉजी (एसआरटी) असे नाव देण्यात आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव या परिसरातील बरेच शेतकरी या पध्दतीने लागवड करीत आहे. यात पूर्णपणे जैविक खतांचा वापर केला जातो. पहिल्या वर्षी या शेतीचा लागवड खर्च अधिक येतो. मात्र दुसऱ्या वर्षीपासून तो कमी होतो.

मनीपूर राज्यात २० टक्के ब्लॉक राईसची शेतीमनीपूर राज्यात २० टक्के शेती ही ब्लॉक राईसची होती. लाखो हो पोयरटन या धानाला मागणी सुध्दा मोठ्या प्रमाणात आहे. विदर्भात सुध्दा हळूहळू या ब्लाक राईसचे लागवड क्षेत्र वाढत असून या धानात पोष्टीकता असून मधूमेही व हद्य रुग्णांसाठी हा तांदूळ चांगला मानला जातो.

देशी वाणांच्या संकलनाचा छंदअशोक खुणे यांने शेतीत नवीन प्रयोग करण्यासह धानाच्या विविध देशी प्रजातींचे संकलन करण्याचा सुध्दा छंद आहे. त्यांनी हिरानखी, चेन्नोर, तुलसीराहुल, कालीकममो, पोयरटन ब्लॉक मनीपूर, रक्तशिला केरला, कालीबाती ब्लाक ओडिसा, कविराज, लिलावती, खुशी, कामिनी, यशोदा, शामला, दुबराज, पीट राईस या धानाच्या बियाणांचे संकल केले आहे. यापैकी पोयरटन ब्लाक मनीपूर, रक्तशिला केरला, कालीबाती ब्लाक ओडिसा या तीन प्रजाती बाहेरच्या आहेत.

शासनाने द्यावे जैविक प्रमाणपत्रविदर्भातील अनेक शेतकरी सेंद्रिय आणि जैविक शेती करीत आहे. मात्र याची नोंदणी करुन प्रमाणपत्र घेण्याचा खर्च अधिक आहे. त्यामुळे बरेच शेतकरी ते करीत नाही. त्यामुळे शासनानेच जैविक शेतीत उत्पादीत शेतमालाचे नमुने घेवून त्यांना जैविकतेचे प्रमाणपत्र उपलब्ध करुन द्यावे. तसेच इतर धानाप्रमाणेच ब्लाईक राईस १५ हजार रुपये प्रती क्विंटल प्रमाणे घेण्याची हमी घ्यावी अशी मागणी प्रगतीशिल शेतकरी अशोक खुणे यांनी केली आहे..

टॅग्स :agricultureशेती