शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

मंगेझरीत झाली काळ्या बिबट्याची शिकार, वन विभागाकडून ५ जणांना अटक

By नरेश रहिले | Published: March 01, 2023 2:21 PM

२१.५० लाख रोख जप्त : फास्यात अडकवून केली त्या आरोपींनी शिकार

नरेश रहिले

गोंदिया : महाराष्ट्रात काळय़ा बिबटय़ाचे अस्तित्व दुर्मिळ असतानाच नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील काळ्या बिबट्याची शिकार १३ जानेवारी २३ रोजी केल्याची कबुली मंगेफरी येथे अटक केलेल्या पाच आरोपींनी दिली आहे. आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे काळ्या बिबटाचे अर्धवट जळालेले हृदय वनविभागाने जप्त केल्याची माहिती नागझिरा नवेगावबांध व्याघ्रप्रकल्पाचे विभागीय वन अधिकारी प्रदिप पाटील यांनी दिली आहे.

गोंदिया जिल्ह्यात वन्यप्राण्याचे अवयवांची तस्करी व विक्री होणार असल्याची खात्रीलायक गुप्त माहिती विशेष व्याघ्र संरक्षण दल व नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी यांना मिळाली होती. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी व पोलिस विभाग, गोंदिया यांच्या एक महिन्याच्या प्रयत्नानंतर पाच आरोपींना पकडण्यात आले. २६ फेब्रुवारी रोजी आरोपी शामलाल ढिवरू मडावी, दिवारू कोल्हारे, माणीक दारसू ताराम, अशोक गोटे, सर्व रा. मंगेझरी, पो. मुरदोली, ता. देवरी व रविंद्र लक्ष्मण बोडगेवार, रा.पालांदूर, ता. देवरी या आरोपींनी मंगेफरी येथे १३ जानेवारी रोजी काळ्या बिबटला फासात अडकवून त्याची शिकार केली. त्या पाचही आरोपींकडून केलेला गुन्हा वदवून टाकला. ही कारवाई नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे उपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जयरामेगौडा आर., पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलिस अधिक्षक अशोक बनकर, विभागीय वन अधिकारी प्रदिप पाटील, देवरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर, नवेगाव वन्यजीव अभयारण्याचे सहायक वनसंरक्षक रोशन राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी, संरक्षण पथक संजय मेंढे, पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, सहायक पोलिस निरीक्षक विजय शिंदे, चिचगडचे ठाणेदार शरद पाटील, सहायक पोलिस निरीक्षक मुरूडकर, नरेंद्र सावंत यांनी केली आहे.

हे साहित्य केले जप्त

वाघ किंवा बिबट या मांजर कुळातील वन्यप्राण्याचे दात २, नख १, अस्वलाचे नखे ३, रानडुक्कर सुळे १०, चितळाचे शिंग १, सायाळ प्राण्याचे काटा, खवल्या मांजराचे खवले २, ताराचे फासे, जिवंत मोर १, मोराचे पिस ५ बंडल, रानगव्याचे शिंग १, जाळे, सुकलेले हाडे, रक्त पापडी (झाडाची साल), सुकवलेले मास, देशी दारु पेटी अंदाजे किंमत ८४ हजार रुपये, रोख रक्कम २१ लाख ४९ हजार ४४० रुपये जप्त करण्यात आले.

व्हीडीओ झाली होती व्हायरल पण वेळीच दाबलीहा काळ्या बिबट फासात अडकल्याची व्हिडीओ १४ जानेवारीला व्हायरल झाली होती. काही लोकांपर्यंत पोहचल्याने वनविभागाने वेळीच या प्रकरणाला वर येऊ दिले नाही. परिणामी ते प्रकरण तिथेच थांबले. परंतु आता अटक झालेल्या आरोपींनी या काळ्या बिबटाच्या शिकारीची कबुली दिल्याने ती व्हिडीओ सत्य असल्याचे वनाधिकारी सांगतात.

कॅमेऱ्यात तो बिबट कैद झाला होता

नागझिरा-नवेगाव टायगर रिझर्व्ह क्षेत्र ६५० चौरस किलोमीटर आहे. ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरा लावण्यात आले आहेत. ब्लॅक लेपर्ड हा आपल्या सोबत्यासह नागझिरा-नवेगाव टायगर रिझर्व्ह (एनएनटीआर) अभयारण्यातील ट्रॅप कॅमेऱ्यात टिपले आहे. या कॅमेऱ्यात झालेल्या नोंदी डब्ल्यूआयआयकडे व भारतीय वन्यजीव संस्थेकडे पाठविल्या जातात. भारतीय वन्यजीव संस्थेतील वैज्ञानिक बिलाल हबीब यांनी ट्विटर हँडलवर बिबट्याच्या जोडीचे छायाचित्र शेअर केल्यानंतर ही बाब उघडकीस आली होती. 

टॅग्स :gondiya-acगोंदियाforestजंगलleopardबिबट्या