शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

बाबुजींच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर सोमवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 10:22 PM

ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त डॉ. हेडगेवार रक्तपेढी होल ब्लड कॉम्पोनेंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.२) सकाळी १० वाजता सिव्हिल लाईन्स येथील सुभाष बागेत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त डॉ. हेडगेवार रक्तपेढी होल ब्लड कॉम्पोनेंट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.२) सकाळी १० वाजता सिव्हिल लाईन्स येथील सुभाष बागेत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात जिल्ह्यातील नागरिकांनी स्वंयस्फूर्त रक्तदान करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन ‘लोकमत’ वृत्तपत्र समूह व डॉ. हेडगेवार रक्तपेढी होल ब्लड कॉम्पोनेंट सेंटरच्यावतीने करण्यात आले आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान असून आपण केलेल्या रक्तदानामुळे संकटाच्यावेळी अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत होते.बरेचदा रक्त न मिळाल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे रक्तदान करुन अशा गरजूंना मदत करण्याची ही संधी ‘लोकमत’ने उपलब्ध करुन दिली आहे. येथील शासकीय ब्लड बँकेत सुद्धा नेहमीच रक्ताची टंचाई असते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी पायपीट करावी लागते. ही अडचण लक्षात घेत ‘लोकमत’ वृत्तपत्र समुहाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. रक्तदान शिबिरात लोकमत सखी मंच व युवा नेक्स्टच्या सदस्य तसेच ‘लोकमत’ वाचकांनी उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख मिलींद वाढई, जिल्हा प्रतिनिधी अंकुश गुंडावार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी बाल मंच जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार (९८२३१८२३६७) व सखी मंच जिल्हा संयोजिका ज्योत्स्ना सहारे (९४२१०६४७२२) यांच्याशी संपर्क साधता येईल.