शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बाबुजींच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर सोमवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:08 AM

ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंती निमित्त लोकमान्य ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने २ जुलैला सकाळी १० वाजता सिव्हिल लाईन येथील सुभाष बागेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंती निमित्त लोकमान्य ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने २ जुलैला सकाळी १० वाजता सिव्हिल लाईन येथील सुभाष बागेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात जिल्ह्यातील नागरिकांनी स्वंयस्फूर्त रक्तदान करण्यासाठी उपस्थित राहावे. असे आवाहन लोकमत वृत्तपत्र समूह व लोकमान्य ब्लड बँकेच्या वतीने करण्यात आले आहे. रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र व कार्ड देण्यात येणार आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान असून आपण केलेल्या रक्तदानामुळे संकटाच्यावेळी अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत होते. बरेचदा रक्त न मिळाल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे रक्तदान करुन अशा गरजूना मदत करण्याची ही संधी लोकमतने उपलब्ध करुन दिली आहे. येथील शासकीय ब्लड बँकेत सुध्दा नेहमीच रक्ताची टंचाईची असते.त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी पायपीट करावी लागते.ही अडचण लक्षात घेत लोकमत वृत्तपत्र समुहाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. रक्तदान शिबिरात लोकमत सखी मंच व युवा नेक्स्टच्या सदस्य व लोकमत वाचकांनी उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख मिलिंद वाढई, जिल्हा प्रतिनिधी अंकुश गुंडावार यांनी आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार ९८२३१८२३६७,सखी मंच जिल्हा संयोजिका ज्योत्सना सहारे ९४२१०६४७२२ यांच्याशी संपर्क साधवा. 

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाBlood Bankरक्तपेढी