गोरेगाव : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ जुलैपासून लोकमत रक्ताचं नातं उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे. याच अंतर्गत गोरेगाव येथील जगत महाविद्यालयात १७ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
लोकमत समूह, जगत महाविद्यालय, निसर्ग मंडळ, चावडी ग्रुपच्या व विविध संघटनाच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रक्तदान शिबिराचे उद्घाटन जगत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. वाय. लंजे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोरेगावचे तहसीलदार सचिन गोस्वावी, प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक सचिन मैत्रे, उपप्राचार्य डाॅ. एस. एच. भैरम, माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार, भाजपा नेते रेखलाल टेभंरे, माजी बांधकाम सभापती रेवेंद्रकुमार बिसेन, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डाॅ. जे. बी. बघेले, प्रा. डाॅ. विजय रहांगडाले, संजय बारेवार, प्रदीप जैन, प्रा. लोकेश कटरे, जगत महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी सहभागी रक्तदान करावे असे आवाहन लोकमत तालुका प्रतिनिधी दिलीप चव्हाण, प्रा. डाॅ. जे. बी. बघेले यांनी केले आहे.
..................................
चांदोरी खुर्द येथे रक्तदान शिबिर १८ रोजी
तिरोडा : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ जुलैपासून लोकमत रक्ताचं नातं उपक्रमातंर्गत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे. याच अंतर्गत तिरोडा तालुक्यातील चांदोरी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य १८ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी सहभागी रक्तदान महादान करावे असे आवाहन लोकमतचे तालुका प्रतिनिधी डी.आर.गिरीपुंजे, विजय खोब्रागडे, हुपराज जमाईवार, हितेंद्र जांभुळकर, हितेश रहांगडाले यांनी केले आहे.