शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
2
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
3
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
4
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
5
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
6
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
7
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
8
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
9
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
11
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
12
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
13
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
14
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
15
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
16
Mahayuti Seat Sharing: भाजपा लढवणार 156 जागा; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती?
17
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली
18
सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण...
19
मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन
20
Google कर्मचाऱ्यांना मोफत भोजन का पुरवते? सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं नेमकं कारण

बाबूजींच्या जयंतीला रक्तदानासाठी पुढाकार

By admin | Published: July 04, 2015 2:10 AM

लोकमत समूहाचे संस्थापक संपादक, स्वातंत्र्य संग्राम सेनानी आणि माजी मंत्री स्व.जवाहरलाल दर्जा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त ...

लोकमतचा उपक्रम : गोंदिया पब्लिक स्कूल व गंगाबाई रूग्णालयाचे सहकार्यगोंदिया : लोकमत समूहाचे संस्थापक संपादक, स्वातंत्र्य संग्राम सेनानी आणि माजी मंत्री स्व.जवाहरलाल दर्जा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि.२) गोंदिया पब्लिक स्कूल येथे रक्तदान शिबिर पार पडले. शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी बाबुजींच्या स्मरणार्थ रक्तदान करून सामाजिक बांधिलकी दाखविली.कार्यक्रमाची सुरूवात बाबुजींच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्ज्वलनाने झाली. उद्घाटन गोंदिया पब्लिक शाळेचे व्यवस्थापक प्रफुल्ल वस्तानी यांच्या हस्ते, प्राचार्य नितू अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून बाई गंगाबाई रक्तपेढीच्या रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख मिलिंद वाढई, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, प्राचार्य लुसी नायर उपस्थित होते.गोंदिया पब्लिक शाळेचे व्यवस्थापक प्रफुल्ल वस्तानी यांनी सदर उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाबुजींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. अनेकांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेतला. रक्तदान करण्यासाठी लोकमतचे जाहिरात प्रतिनिधी अतुल कडू, प्रसार प्रतिनिधी पंकज धमदार यांच्यासह अश्विन नेवारे, ध्रुव रायगुडिया, सुप्रिया बागडे, सिद्धी कटरे, राजेश सोनवाने, कुशल बागडे, ग्रिस कोरे, विलास नरोती, लक्ष्मी गडपाल, राधा मेश्राम, छोटेलाल पटले, क्रिष्णा मोहन, राधेश्याम, अनिता हलानी, दिलीप तुप्पट, एस.एस. राठोड, रूपेश मेंढे, मालिनी मिश्रा, विजेंद्र दमाहे, हिरामन भुरे, दीपाल पांडे, प्रशांत गुर्वे, सचिन ब्राह्मणकर, मोहसीन शेख, राजेश नक्षिणे, जितेश येरणे, गुलाब, प्रणयकुमार तसेच अनेकांनी पुढाकार घेतला. सर्व रक्तदात्यांना अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र, डोनर कार्ड व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. संचालन लोकमत युवा नेक्स्टच्या जिल्हा संयोजिका दिव्या भगत यांनी तर आभार बालविकास मंचचे जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी जिल्हा लघु जाहिरात प्रतिनिधी राजू फुंडे, वर्षा भांडारकर, प्रमोद गुडधे, विनोद बन्सोड, दर्पण वानखेडे, राजेश लांजेवार, राकेश भांडारकर, गोंदिया पब्लिक स्कूलचे कर्मचारी व गंगाबाई रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)‘लोकमत’च्या सामाजिक उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुकयावेळी बाबूजींंचा सामाजिक दृष्टीकोण आणि लोकमतचे सामाजिक दायित्व याबद्दल सांगताना मनोज ताजने यांनी बाबुजींच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडले. तसेच एक स्वातंत्र्य सेनानी, राज्याचे विविध खात्यांचे मंत्री या नात्याने त्यांनी दिलेले योगदान आणि लोकमतने वेळोवेळी जपलेला सामाजिक वसा याबद्दलची माहिती दिली.डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी, रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. प्रत्येक नागरिकाने सहभागी होवून सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. लोकमतने बाबुजींच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करणे कौतुकास्पद आहे. प्रत्येक १८ वर्षांवरील निरोगी व्यक्ती वर्षातून चार वेळा रक्तदान करु शकतो. प्रत्येकाने यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. गोंदिया पब्लिक स्कूलच्या सचिव इंदिरा सपाटे यांनी रक्तदानामुळे आपल्याला दुसऱ्यांचे जीव वाचविण्यासाठी मदत केल्याचे समाधान मिळते. प्रत्येकाने रक्तदान करून असे पुण्यकर्म करावे असे आवाहन करून बाबुजींच्या जयंतीनिमित्त लोकमतने आयोजित केलेला सदर उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.