शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
3
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
4
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
5
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
6
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
7
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
8
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
9
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
10
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
11
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
12
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
13
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
14
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
15
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
16
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
17
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
18
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
19
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
20
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान

निळया आकाशाखाली होते आयुष्याची संध्याकाळ

By admin | Published: July 02, 2014 11:20 PM

जन्म उघड्यावर, संसार उघड्यावर आणि मरणही उघड्यावरच होणाऱ्या मेंढपाळांच्या समस्या पिढयान्पिढ्या 'जैसे थे' आहेत. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत वितभर पोटासाठी रानावनात व गावोगावी

व्यथा मेंढपाळांची : सुविधांपासून वंचित, भटकंती करून उदरनिर्वाहनरेश रहिले - गोंदियाजन्म उघड्यावर, संसार उघड्यावर आणि मरणही उघड्यावरच होणाऱ्या मेंढपाळांच्या समस्या पिढयान्पिढ्या 'जैसे थे' आहेत. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत वितभर पोटासाठी रानावनात व गावोगावी फिरणाऱ्या मेंढीपालन करणाऱ्या लोकांची केवीलवाणी हाक शासनही ऐकत नाही.अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी व्यक्ती धडपड करतो व तो कुठे कमी पडल्यास शासनही मदत करते. परंतु गुजरातच्या भूज जिल्ह्यातील कच्छ परिसरातील शेकडो मेंढीपालन करणारे कुटुंब पिढ्यान पिढ्यांपासून गोंदिया जिल्ह्यात वनवन भटकत आहेत. गुजरातमध्ये दुष्काळ पडल्यामुळे ते शेकडो कुटुंब आपल्या शेळ्या-मेंढ्या, उंट घेऊन महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ प्रदेशाकडे आले. तेव्हापासून आतापर्यंत ते गोंदिया जिल्ह्यात मेंढीपालनाचा व्यवसाय करून आपली उपजीविका चालवितात. मेंढीपासून निघणारी लोकर विकून आपला संसार चालविण्याचा त्यांचा खटाटोप आहे. परंतु एक डेरावाल्याला मेंढीच्या एका कळपापासून अवघी एक ते दीड क्विंटल लोकर मिळते. तीन हजार रुपये क्विंटलप्रमाणे त्याची विक्री करतात. एका डेरावाल्याला एक ते दीड क्विंटल लोकर मिळत असल्याने तीन महिन्यात तीन ते साडेतीन हजार रुपये त्यांना मिळतात. एका वर्षात एका मेंढीचे केस कापले जाते. एका मेंढीपासुन एक पाव ते अर्धा किलो वजनाचे केस निघतात. त्यातून मिळणाऱ्या अल्पशा मोबदल्यातून गहू, तेल, मीठ, तिखट अश्या सर्वच वस्तु त्यांना खरेदी कराव्या लागत असल्याने या मेंढीपालन करणाऱ्यांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. त्यांच्याजवळ इंधनाची सोय नसल्याने कच्च्या दुधाचे सेवन करावे लागते. पावसाळ्याच्या दिवसात पावसाची रिपरिप किंवा मुसळधार पाऊस असला तर एक पोळी तयार करायला चार-चार तास लागतात असे तेथील महिलांनी सांगितले. एका कुटुंबात चार ते १५ जणांचा समावेश असून मेंढीचे दूध व लोकरपासून मिळणाऱ्या पैशावर आपला उदरनिर्वाह चालविण्याचा खटाटोप या मेंढीपालन करण्यांचा असतो. गव्हाची पोळी, मेंढीचे दुध,ताक व भाजी हे त्यांचे मुख्य खाद्य पदार्थ आहे. पावसाळ्यात रॉकेल उपलब्ध राहात नसल्याने इंधनाची सोय म्हणून वाहनाचे टायर स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापरतात. टायर जाळल्यावर निघणाऱ्या कार्डन डायआॅक्साईडमुळे अनेक महिला आजारीही पडतात. पावसात टायर भिजले तर पावसाळ्यात जेवणही त्यांच्या नशीबात येत नाही. भारतात राहतात परंतु मतदानाचा हक्क नाही, रेशन कार्ड नाही, शासनाच्या सर्व योजनांपासून मुकलेली ही जमात पिढ्यान पिढ्यांपासून वनात भटकत किंवा गावाच्या शेजारी डेरा टाकून आपला व्यवसाय चालवित आहे. जन्मापासून तर मरणापर्यंत महाराष्ट्रात राहणारी ही जमात उपेक्षित आहे. रानावनात आपल्या मेंढया चारून पठारावर आपला डेरा ठोकून रात्र दोन रात्री काढणाऱ्या या शेकडो कुटुंबाना निवाऱ्याची सोय नाही. उघड्या मैदानावर तंबू उभारून रात्र घालविणाऱ्या या शेकडो कुटुंबांना कायमस्वरूपी छत मिळण्यासाठी आजपर्यंत कोणीही पुढाकार घेतलेला नाही.