गोंदिया : वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसतानाही रुग्णांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टरांच्या विरोधात गेल्या वर्षभरात फक्त १ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने लोकांनी आता तक्रार करणेही बंदच केले आहे. गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही राजरोसपणे बोगस डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार केले जातात. त्यांचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी तालुका चौकशी समितीने अधिक सक्रिय होऊन काम करणे गरजेचे आहे.
डॉक्टरकीची कोणतीही पदवी न घेता केवळ एखाद्या रुग्णालयात डॉक्टरच्या हाताखाली काही वर्षे काम केलेले लोक फक्त अनुभवाचा आधार घेऊन रुग्णांवर उपचार करतात. त्यांच्या डिग्रीची शहानिशा न करता लोक हातगुण चांगला म्हणून त्याच्याकडे उपचारासाठी रांगेत उभे राहतात. यात एखाद्या रुग्णाचा जीव गेल्यावरच पोलखोल होते. अशा बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी नगरपालिका, तालुका व जिल्हा प्रशासन पुढे येत नाही. सालेकसा तालुक्याच्या साखरीटोला येथील एका बोगस डॉक्टरने चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया करून एका तरुणीचा जीव घेतला.
...............................
जिल्ह्यातील अधिकृत रुग्णालये-
वर्षभरात बोगस डॉक्टरांवर कारवाई-०१
................
सात तालुक्यांत एकही कारवाई नाही
गोंदिया जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आहे; परंतु तालुका किंवा जिल्हा समित्या या बोगस डॉक्टरांवर कारवाई करीत नाहीत. कोरोनाच्या काळातही बोगस डॉक्टरांचा व्यवसाय जोमाने चालला. आमगाव, देवरी, सडक-अर्जनी, अर्जुनी-मोरगाव, गोरेगाव, तिराेडा व गोंदिया या सात तालुक्यांत बोगस डॉक्टरांवर मागील तीन वर्षांत एकही कारवाई नाही.
.................
तालुका समितीत कोण-कोण असते?
तालुका समितीतील सदस्य तालुका समितीत गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी असतात. नगरपालिका व महापालिका स्तरावर स्वतंत्र समिती असते. जिल्हाधिकारी स्तरावरील समितीत जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक असे अधिकारी असतात.
..............
वर्षभरात कोणत्या तालुक्यात किती कारवाया?
आमगाव----००
सालेकसा----०१
देवरी --------००
सडक-अर्जनी---००
अर्जुनी-मोरगाव--००
गोरेगाव------------००
तिराेडा------------००
गोंदिया----------००
............... कोट
बोगस डॉक्टरांसंदर्भात तक्रार आल्यास आम्ही कारवाई करतो. बोगस डॉक्टर आहेत अशी तक्रार आलीच नाही तर कारवाई कशी करणार? तक्रार जिल्हाधिकारी किंवा मुकाअ यांच्याकडे आल्यास आम्ही कारवाई करतो. वेळ पडली तर बोगस डॉक्टरांवर फौजदारी कारवाईदेखील केली जाते.
- डॉ. वेदप्रकाश चौरागडे, तालुका वैद्यकीय अधिकारी.