लोकमत न्यूज नेटवर्ककाचेवानी : मागे राज्य शासनाने परिपत्रक काढून धानाची बोनस मर्यादा पाच क्विंटल ठेवली होती. ही मर्यादा चुकीची असून ती ५० क्विंटल करण्याची मागणी आमदार विजय रहांगडाले यांनी केली होती. त्यांच्या मागणीला यश येवून शासनाने नवीन परिपत्रक काढले. आता ५० क्विंटलपर्यंत धान विकणाऱ्या शेतकºयांना याचा लाभ मिळणार आहे.यापूर्वी आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम २०१७-१८ मधील खरेदी केलेल्या धानासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दराव्यतिरिक्त प्रतिक्विंटल २०० रूपये प्रोत्साहनपर रक्कम राज्य शासनाने मंजूर केली होती. यात पाच क्विंटलची मर्यादा होती. त्यामुळे शेतकºयांमध्ये नाराजी पसरली होती. शेतकºयांनी आमदार रहांगडाले यांच्याकडे नाराजी व्यक्त करीत पाच क्विंटलची मर्यादा रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच ५० क्विंटल किंवा त्यापेक्षा अधिक क्विंटलची मर्यादा करण्याच्या मागणीचे निवेदन दिले होते. यावर आ. रहांगडाले यांनी, शासनाशी बोलणी करून त्वरित सुधारणा करण्याचे आश्वासन शेतकºयांना दिले होते.आ. रहांगडाले यांनी अन्न व ग्राहक संरक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेतली. तसेच बोनस मर्यादा पाच क्विंटल फारच कमी आहे. परिपत्रकात चुकीचे दर्शविण्यात आल्याचे लक्षात आणून दिले. यावर दोन्ही मंत्र्यांनी बोनस मर्यादा पाच क्विंटल नसून ५० क्विंटल असल्याचे सांगितले. या निर्णयाची त्वरित प्रत काढण्याचे आश्वासनही आ. रहांगडाले यांना दिले.अन्न, नागरी पुरवठा व संरक्षण विभाग शासन शुद्धीपत्रक क्रमांक (खरेदी १०१८/प्र.क्र. ५९/नापु २९ दि. १९ एप्रिल २०१८) व शासन निर्णय (दि.१८ एप्रिल २०१८) काढून प्रति शेतकरी पाच क्विंटल मर्यादाऐवजी प्रति शेतकरी ५० क्विंटल मर्यादा समजण्यात यावी, असे शुद्धीपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे आता ५० क्विंटल धान विकणाºया शेतकºयांना एक लाख रूपये मिळू शकतील. याबद्दल आ. रहांगडाले यांनी शासनाचे आभार मानले. शासनाने परिपत्रकात यापूर्वी परिच्छेद ५ मधील ओळ क्रमांक २ मध्ये, याकरिता १२.५० कोटी रूपयांची तरतूद केली होती. त्याऐवजी १०० कोटी असे वाचावे, असे कळविण्यात आले आहे. हे परिपत्रक राज्याचे उपसचिव सतीश सुुपे यांनी काढले आहे.धान बोनस मर्यादा पाच क्विंटल मर्यादा खोडून ५० क्विंटल केल्याने राज्य शासन तसेच तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आ. विजय रहांगडाले यांचे आभार क्षेत्रातील नागरिकांनी मानले आहे.
५० क्विंटलपर्यंत धानाला मिळणार बोनस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 9:03 PM
मागे राज्य शासनाने परिपत्रक काढून धानाची बोनस मर्यादा पाच क्विंटल ठेवली होती. ही मर्यादा चुकीची असून ती ५० क्विंटल करण्याची मागणी आमदार विजय रहांगडाले यांनी केली होती. त्यांच्या मागणीला यश येवून शासनाने नवीन परिपत्रक काढले.
ठळक मुद्देशासनाचे नवीन परिपत्रक : विजय रहांगडाले यांच्या मागणीला यश