शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ? सोलापूरात एकाच जागेवर ठाकरेंचा अन् काँग्रेसचा उमेदवार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
5
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
6
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
7
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
11
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
12
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
13
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
14
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
16
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
17
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
18
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
19
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
20
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?

शाळा सत्र सुरू होऊनही पुस्तके हातात पडली नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:20 PM

Gondia News पूर्वी विद्यार्थ्यांनी वापरलेली पुस्तके घरातील धाकट्यांना वापरता येत होती किंवा गरजूंना दिली जात होती. मात्र, आता ती पद्धत संपुष्टात आली आहे. आता दरवर्षी मुलांना नवीन पुस्तके द्यावी लागतात. मात्र, यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होतो. 

ठळक मुद्देशिक्षण विभागाचा अजब कारभार शिक्षण मंडळाने यंदापासून विद्यार्थ्यांकडून पुस्तके परत घेण्यास सांगितले होते. त्यानुसार, जिल्ह्यातील फक्त १० टक्केच विद्यार्थ्यांकडून पुस्तके परत मिळाली आहेत.

 लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शिक्षणाचा सक्तीचा अधिकारअंतर्गत शासनाकडून पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. त्यानुसार, यंदा सर्व शिक्षा अभियानकडून जिल्ह्यातील ९५७८८ विद्यार्थ्यांसाठी ५८८१२७ पाठ्यपुस्तकांची मागणी करण्यात आली होती. आता कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असून शाळा सत्र सुरू झाले असून पुन्हा ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली आहे.

मात्र आश्चर्याची बाब अशी की, अद्याप विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके आलेली नाहीत. अशात या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा असा प्रश्न पडत आहे. अगोदरच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणामुळे कित्येक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कित्येकांकडे स्मार्टफोन नसल्याने ते शिक्षणापासून वंचित आहेत. तर काही ठिकाणी नेटवर्कची समस्या असल्याने तेही शिक्षणाला मुकत आहेत. त्यात आता ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल व नेटवर्क आहे त्यांची पुस्तकेच हाती नसल्याने अडचण होत आहे. आता कुठे पुस्तकांचे वितरण सुरू झाले असून ते झाल्यावरच विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शाळा सुरू झाल्याचा अनुभव येणार.

१० टक्के मुलांनीच केली पुस्तके परत

पूर्वी विद्यार्थ्यांनी वापरलेली पुस्तके घरातील धाकट्यांना वापरता येत होती किंवा गरजूंना दिली जात होती. मात्र, आता ती पद्धत संपुष्टात आली आहे. आता दरवर्षी मुलांना नवीन पुस्तके द्यावी लागतात. मात्र, यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होतो. 

पुस्तके नाहीत, अभ्यास कसा करणार ?

आमचा ऑनलाईन अभ्यास सुरू झाला आहे. मात्र, आमच्या हाती आतापर्यंत पुस्तके आलेली नाहीत. अशात आम्ही अभ्यास कसा करावा. पुस्तके हाती आल्यावरच आम्हांला त्यातील काही समजणार. त्यामुळे आता पुस्तकांची वाट पहात आहे.

- कर्णिका रहिले (पदमपूर)

कोरोनामुळे यंदाही ऑनलाईन वर्ग सुरू झाले आहेत. मात्र, अभ्यास करण्यासाठी आम्हांला पुस्तकांची गरज असून ती आम्हांला आतापर्यंत मिळालेली नाहीत. अशात आता आम्ही ऑनलाईन वर्गात राहून अभ्यास कसा करावा. पुस्तकांची वाट बघत आहोत.

- अंश भेंडारकर (अर्जुनी-मोरगाव)

आम्ही सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांकडून त्यांच्याकडील पुस्तके परत घेतली होती. त्या पुस्तकांचे आताच्या विद्यार्थ्यांत वितरण केले आहे. त्यात आता सध्या ब्रिज कोर्स सुरू असून ज्या विदयार्थ्यांना पुस्तके मिळालेली नाहीत. त्यांचाही अभ्यास बुडणार नाही.

- राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

----------------------------

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र