शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

सुरूवातीलाच मिळणार पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 8:27 PM

शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. मात्र दरवर्षी शैक्षणिक सत्राला दोन तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले जात नव्हते.

ठळक मुद्देइयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश : ५ लाख ९१ हजार पुस्तके प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. मात्र दरवर्षी शैक्षणिक सत्राला दोन तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले जात नव्हते. त्यामुळे बरेच पालक पाल्यांसाठी बाजारपेठेतून पुस्तके खरेदी करीत होते. मात्र यंदा या सर्व गोष्टींची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ५ लाख ९१ हजार पुस्तके उपलब्ध करुन दिली आहे.त्यामुळे यंदा सत्राच्या सुरूवातीलाच पुस्तके मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.जिल्हा परिषद, नगर परिषद, खासगी अनुदानीत, शासकीय आश्रम शाळा, खासगी अनुदानित आश्रम शाळा, अंशत: अनुदानित आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याची योजना शासनाने सुरू केली आहे. यासाठी गोंदिया शिक्षण विभागाने ६ लाख ७५ हजार ५६४ पुस्तकांची मागणी बालभारतीकडे केली होती. त्यापैकी ५ लाख ९१ हजार ५१६ पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. तर उर्वरित ८४ हजार ४८ पुस्तके १५ जूनपर्यंत मिळणार असल्याची माहिती आहे.त्यामुळे उशिरा पुस्तके मिळण्याची तक्रार करण्याची पाळी यंदा विद्यार्थ्यांवर येणार नाही.पुस्तकांसाठी २ कोटी ४३ लाख खर्चइयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप करण्यासाठी २ कोटी ४३ लाख ५८ हजार ६० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तर ३३ लाख ६ हजार ७१८ रूपये शिल्लक आहेत. सडक-अर्जुनी तालुक्याला पुस्तकांसाठी २६ लाख ८६ हजार ८९१ रूपये, अर्जुनी-मोरगाव ३६ लाख ९९ हजार ९१३ रूपये, देवरी २६ लाख ३४ हजार ३९५ रूपये, तिरोडा ३६ लाख ९३ हजार ६०२ रूपये, गोंदिया ७९ लाख ६१ हजार २१२ रूपये, गोरेगाव २३ लाख ९४ हजार ४६८ रूपये, आमगाव २५ लाख ७५ हजार ४४ रूपये, सालेकसा २० लाख १९ हजार २५३ रूपयांचा निधी देण्यात आला.नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके लवकरचइयत्ता पहिली व आठवीच्या अभ्यासक्रमात बदल झाल्यामुळे नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके सध्या बालभारतीकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे ८४ हजार पुस्तके कमी उपलब्ध झाली. १५ जूनपर्यंत सर्व तालुक्यांना पुस्तकांचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :educationशैक्षणिक