शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

गोंदिया जिल्ह्यातील सूर्यादेव मांडोदेवी देवस्थानाला निसर्गाचे वरदान; जागृत देवस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 12:01 PM

जिल्ह्यातल्या गोरेगाव तालुक्यातील सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान बघेडा जागृत देवस्थान आहे. येथे वर्षाकाठी हजारो पर्यटक भाविक दर्शनासाठी येतात.

ठळक मुद्देदररोज हजारो पर्यटकांची भेटवर्षांतून सहा यात्रा

दिलीप चव्हाण/वामनराव गोळंगे।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: जिल्ह्यातल्या गोरेगाव तालुक्यातील सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान बघेडा जागृत देवस्थान आहे. येथे वर्षाकाठी हजारो पर्यटक भाविक दर्शनासाठी येतात. निसर्गरम्य या परिसराला विविधतेने नटलेले आहे. विपुल नैसर्गिक साधन संपत्तीने व नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या देवस्थानाला खरी झालर आहे ती निसर्गाचीच.गोरेगाववरुन २५ किलोमीटर मुंडीपार-हरदोली रस्त्यावर हे देवस्थान वसलेले आहे. घनदाट जंगलात एका भव्य दगडाखाली मांडोदेवीची मूर्ती आहे. तर गुफेत भगवान श्रीकृष्ण, अन्नपुर्णा देवी व शिवजीचा वास आहे. तर बाजुलाच भगवान शंकराचीे भव्य मूर्ती आहे. पूर्वेस हनुमानजी, शंकर-पार्वती, हवनकुंड व कलशभवनच्या बाजूला भगवान सूर्यादेव यांची मूर्ती आहे.सुर्यादेव मांडोदेवी देवस्थान संपूर्ण महाराष्टत प्रसिद्ध आहे. या देवस्थानामुळे शंभर कुटुंबाना रोजगार मिळाला आहे. येथे वर्षाकाठी सहा यात्रा भरतात. मकर संक्रात, शिवरात्री, चैत्र नवरात्र (रामनवमी), अखंड रामायण पाठ, अश्विन नवरात्र, मंडई या यात्रांना मध्यप्रदेश, नागपूर, चंद्रपूर, रामटेक, नाशिक या जिल्ह्यातून हजारो पर्यटक भाविक देवदर्शनाला येतात. विशेष म्हणजे मकर संक्रात व रामनवमीला येथे सर्वाधिक गर्दी असते.पर्यटक भाविक यांनी दानातून येथे लहान-मोठे विकास केले जाते सोबतच येथे काम करणाऱ्या दहा कर्मचारी व मंदिराचा सर्व खर्च दान स्वरुपात प्राप्त होणाऱ्या रक्कमेतून केला जातो. तर पुजारी म्हणून ३० वर्षापासून अयोध्यादास बिलोहा पुजापाठाचे काम पाहतात.

लोकप्रतिनिधींची आश्वासने हवीतगोंदिया जिल्ह्यातील एकमेव पर्यटन स्थळ असलेल्या मांडोदेवी देवस्थानाला राजकारण्यांनी केवळ आश्वासन पूरतेच ठेवलेले आहे. या क्षेत्राचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी २ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. जि.प. उपाध्यक्षा रचणा गहाणे यांनी ५० लाख व आ. संजय पुराम यांनी निधी कमी पडू देणार नाही. कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून खेचून आणणार असे भाषणातून सांगितले होते. मात्र राजकारण्यांनी दिलेले आश्वासन फक्त आश्वासनच ठरले.साधू संताने केले होते मार्गदर्शनमध्यप्रदेश राज्यातून आलेला सूर्यादेव ईश्वरकुर्रा व बहीण मांडोबााई दुखी होवून मांडोदेवी परिसरात आले होते. तेव्हा एका साधू संताने त्या तिन्ही भावंडाना पुण्याचे काम करण्याचे मार्गदर्शन केले. यावर त्यांनी पाण्याची समस्या सोडविण्यासाठी तलाव खोदण्याचे काम हाती घेतले. आजही ते तलाव अस्तीत्वात आहे. तलावातील पाण्यामुळे पशुपक्षी-जनावरे याच पाण्याचा उपयोग करतात.तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास निधीच्या माध्यमातून मांडोदेवी देवस्थानाला अजूनही विकासासाठी १० कोटी रुपयांची गरज आहे. दररोज येथे पर्यटक, भाविक दर्शनाला येतात. यासाठी या क्षेत्राला सर्वश्रेष्ठ पर्यटन क्षेत्र बनविण्यासाठी मांडोबाई देवस्थान समिती कट्टीबद्ध आहे.-विनोद अग्रवाल,सचिव सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान समिती, बघेडा (तेढा)

टॅग्स :cultureसांस्कृतिक