शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

बोपाबोडीतील ४० हेक्टर रोपवन झाले राख

By admin | Published: June 11, 2017 1:08 AM

वृक्षसंवर्धनासाठी शासनाचा आटापिटा सुरू आहे तर दुसरीकडे त्या वनांच्या संवर्धनासाठी असलेले

फायर लाईन जाळली नव्हती: १०० मजुरांची बोगस मजुरी काढली बबलू मारवाडे । लोकमत न्यूज नेटवर्क सौंदड : वृक्षसंवर्धनासाठी शासनाचा आटापिटा सुरू आहे तर दुसरीकडे त्या वनांच्या संवर्धनासाठी असलेले वनाधिकारी आपल्या कर्तव्यात कसूर करीत असल्याने वनांची राखरांगोळी होत आहे. बोपाबोडी येथील ४० हेक्टर रोपवन याच हलगर्जीपणाचा नमुना आहे. फायर लाईनसाठी आलेला पैसा वनाधिकाऱ्यांनी आपल्या घशात टाकला. त्यामुळे बोपाबोडी येथील वनरोप आगीत स्वाहा झाले. ही आग आठवडाभरापूर्वी झाली. सडक-अर्जुनी तालुक्याच्या बोपाबोडी रोपवनात फायर लाईनचे यंदा काम न झाल्याने जंगलाला आग लागली. परिणामी ही आग वाढत गेली. वनरक्षक विजय कागदी मेश्राम व क्षेत्र सहाय्यक बेलखोडे यांनी फायर लाईनचे पैसे गडप केल्याचा आरोप वनमजूर यादोराव विनाराम कापगते व पतीराम सदाशिव भुरे यांनी केला आहे. बोपाबोडी येथे १०० हेक्टर परिसरात रोपवन आहे. ५०-५० हेक्टरचे दोन प्लाट आहेत. या प्लाटच्या फायर लाईनचे काम करण्यासाठी वनविभागामार्फत पैसा देण्यात आला. परंतु या ठिकाणचे फक्त ४ ते ५ हेक्टर फायर लाईनचे काम करण्यात आले. उर्वरीत लाईनचे काम करण्यात आले नाही. या फायर लाईनच्या कामावर मनुष्यबळ लावल्याची खोटी माहिती करून १०० बोगस मजुरांची मजूरी येथील वनाधिकाऱ्यांनी उचलली आहे. या कामावर १० मजूरांनी काही दिवस काम केले मात्र १८ मजूर कामावर दाखविण्यात आले. या प्रकाराचा विरोध तेथील वनमजुरांनी केला. त्यामुळे त्या वनमजुरांना संबधीत अधिकाऱ्यांनी कामावरून काढून टाकले. १०० मजुरांची मजूरी बोगस दर्शवून २०१ रूपये रोजीच्या हिशेबाने २० हजार १०० रूपये हडपण्यात आले आहेत. मजूरांना काम न देता फायर लाईनच्या कामाचे पैसे हडपल्याने या रोपवनाला आग लागली. यात ४० हेक्टर रोपवन राख झाले. भ्रष्टाचाराचा कळस गाठणाऱ्या या अधिकाऱ्यांवरही कारवाई न झाल्याने वरिष्ट अधिकारी त्याच्यावर मेहरबान आहेत का, असा सवाल नागरिकांना होत आहे. या आगीत कोट्यवधीचे नुकसान झाले. परंतु या नुकसनाीचा आकडा येथील अधिकाऱ्यांनी उपवन संरक्षक कार्यालयाला कळविले किंवा नाही ही बाब मात्र गुलदस्त्यात आहे. या आगीत स्वाहा झालेल्या वनउपजाची चौकशी करून झालेला नुकसान या अधिकाऱ्यांच्या खिशातून वसूल करण्यात यावा असा सूर उमटत आहे. क्षेत्र सहाय्यकाची बनवाबनवी या प्रकरणासंदर्भात क्षेत्र सहाय्यक विलास बेलखोडे यांची विचारणा केली असता जंगल जळाल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. मात्र वनमजूर हे प्रकरण बाहेर काढत असल्याचे ते म्हणाले. फायर लाईनचे काम झाले आहे. मी व्हाऊचर काढले आहेत. बोगस मजूर व फायर लाईनसाठी आलेला पैसा यासंदर्भात बोलणे टाळून माझी पदोन्नती झाली आहे त्या संदर्भात मला कसलेही घेणेदेणे नाही असे त्यांनी बोलून वेळकाढू धोरण राबविले.