देवरी, आमगाव व सालेकसा तालुक्यांतील एकूण ८३ गावांत दरवर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. त्यामुळे येथील लोकांना पाण्याकरिता खूप पायपीट करावी लागत होती. ही बाब लक्षात घेता आ. सहषराम कोरोटे यांनी १ कोटी रुपयांचा निधी नवीन बोअरवेल बांधकामासाठी मंजूर केला. याअंतर्गत देवरी तालुक्यातील फुटाणा, परसोडी, पिंडकेपार, निलज, चिचगड, कोसबी, पिपरखारी, मासुलकसा, मल्हारबोडी, पळसगाव, सुकडी, हेरपार, चंदीटोला, गडेगाव, कथलीटोला, मेहताखेडा, रेहळीफाटा, कडीकसा, गुजरबडगा, मिसपीरी, महाका, ढुबरुटोला, चिपोटा, चिल्हाटी, ककोडी व धोबीटोला आणि आमगाव तालुक्यातील पदमपूर २ ठिकाणी, आमगाव २, रिसामा २, सरकारटोला २, बोदा २, गिरोला २, माल्ही, बीर्सी, गोरठा, बोथली, घाटटेमणी, टाकरी, भोसा, कालीमाटी, टेकरी, मरारटोला, कट्टीपार, गोंडीटोला, बुराडीटोला, करंजी, चिरचाळबांध, बंजारीटोला, कार्तुली, जवरी, मरारटोला व किकरीपार व सालेकसा तालुक्यातील महाराजीटोला, कावराबांध, सलंगटोला, झालीया, मुरुमटोला, पानगाव, कुणबीटोला, भर्राटोला, महारीटोला, सोनपुरी, झालीया, टोयागोंदी, रोडा, पोवारीटोला, साखरीटोला, जमाकुडो, दल्लाटोला, पठाणटोला, पिपरीया, सोनपुरी, शिकारीटोला या गावांमध्ये बोअवेल खोदकामाला सुरुवात करण्यात आली आहे.
पाणीटंचाईग्रस्त ८३ गावांत बोअरवेल खोदकामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:22 AM