लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्ह्याशी आपले फार जुने भावनिक आणि पारिवारीक नाते आहे. या जिल्ह्याने आपल्या सदैव प्रेम व आदर दिला आहे. मी जेव्हा जेव्हा येथे येतो तेव्हा तेव्हा मला माझे तरुणपण आठविते. गोंदिया जिल्हा मध्यप्रदेशाला लागून असून या जिल्ह्याच्या विकासाला आपले सदैव प्राधान्य राहील. गोंदिया-बालाघाट जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर डांर्गोली सिंचन प्रकल्प उभारण्याची प्रफुल्ल पटेल यांचा आग्रह असून ही मागणी आपण अवश्य पूर्ण करु. या दोन्ही जिल्ह्यातील शेतकºयांना सिंचनाच्या बाबतीत समृध्द करण्याची ग्वाही मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिली.स्व. मनोहरभाई पटेल यांच्या ११३ व्या जयंती निमित्त शालेय व पदव्युत्तर अभ्यासक्रमात सर्वाधीक गुण घेवून उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांना स्व. मनोहरभाई पटेल सुवर्ण पदक वितरण कार्यक्रमात कमलनाथ यांचा नागरी सत्कार शनिवारी (दि.९) स्थानिक धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या प्रागंणावर पार पडलेल्या कार्यक्रमात करण्यात आला.प्रमुख पाहुणे सिनेअभिनेता संजय दत्त, प्रसिध्द उद्योगपती वेदांना ग्रुपचे अनिल अग्रवाल, किरण अग्रवाल व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. प्रफुल्ल पटेल होते.कमलनाथ म्हणाले, डांर्गोली सिंचन प्रकल्पाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी गोंदिया जिल्ह्याला मध्यप्रदेशाशी जोडण्याचा विनोदात्मक सल्ला देखील त्यांनी दिला. भविष्यात गोंदिया जिल्ह्यात अनके विकासात्मक कामे करण्याची ग्वाही कमलनाथ यांनी दिली. शिक्षणाच्या क्षेत्रात झपाट्याने परिवर्तन होत असून शिक्षण संस्थांनी सुध्दा परिवर्तन स्विकारुन विद्यार्थ्यांना त्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध करुन देण्याची गरज असल्याचे सांगितले. पटेल म्हणाले कमलनाथ यांचे गोंदियाशी केवळ मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर कौटुंबीक नाते आहे. ते मुख्यमंत्री झाल्याने गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या विकासाला निश्चितच गती मिळेल. बावनथडी व डांर्गोली उपसा सिंचन योजना मार्गी लावून या जिल्ह्यातील शेतकºयांना सिंचनाच्या बाबतीत समृध्द करतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच कमलनाथ यांची नेहमी विकासात्मक कामासाठी सकारात्मक भूमिका राहिली आहे. आता मुख्यमंत्री झाल्याने याचा गोंदिया-भंडारा जिल्ह्याला निश्चित लाभ होईल.धानाला २५०० रुपये भाव मिळवून देण्यासाठी मदत करा- प्रफुल्ल पटेललगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकार सत्तेवर येताच धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये भाव देण्यात आला. तो दर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळावा यासाठी प्रयत्न करावा. यामुळे संकटातील शेतकऱ्यांना सावरण्यास मोठी मदत होईल. असा आग्रह प्रफुल्ल पटेल मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडे धरला. तसेच गोंदिया आणि भंडारा जिल्हा मध्यप्रदेशाला लागून असून या जिल्ह्यात मोठे उद्योग स्थापन करुन रोजगारच्या संधी निर्माण करण्याची मागणी केली.
दोन्ही जिल्हे सिंचनाने समृद्ध करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:58 AM
गोंदिया जिल्ह्याशी आपले फार जुने भावनिक आणि पारिवारीक नाते आहे. या जिल्ह्याने आपल्या सदैव प्रेम व आदर दिला आहे. मी जेव्हा जेव्हा येथे येतो तेव्हा तेव्हा मला माझे तरुणपण आठविते. गोंदिया जिल्हा मध्यप्रदेशाला लागून असून या जिल्ह्याच्या विकासाला आपले सदैव प्राधान्य राहील.
ठळक मुद्देकमलनाथ : महाराष्ट्रातील १० हजार हेक्टर क्षेत्राला सिंचन, प्रफुल्ल पटेल यांचा आग्रह