गोंदिया : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाड़ी कर्मचारी यूनियन आयटक व कृति समीतीद्वारे अगणंवाडी सेविका मदतनिस यांनी मानधंनात वाढ करा या मागणीसाठी गुरुवारी (दि.११) जिल्हा परिषदेवर कटोरा मोर्चा काढून शासनाचा निषेध नोंदविला.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पेन्शन लागू करा, कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, ग्रेच्युटी लागू करा, मदतनिसांना प्रमोशन दया, मिनी अंगणवाडीला अगणंवाडी दर्जा दया इत्यादी मागण्यांसाठी ४ डिंसेबरपासुन राज्य व्यापी संप सुरू आहे. २ लाखच्यावर अंगणवाडी सेविका संपात सहभागी झाल्या आहेत. परंतु राज्य शासन अगणंवाडी कर्मचाऱ्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत नाही. याचा निषेध नोंदविण्यासाठी गुरुवारी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर कटोरा मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
मोर्चाचे नेतृत्व आयटक महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहांगडाले, आयटक जिल्हा सचिव रामचंद्र पाटिल, शकुंतला फटींग, जिल्हा अध्यक्ष विठा पवार, राज्य सचिव पोणिॅमा चुटे, जिल्हा सचिव जीवन कला वैद्य, कोषाध्यक्ष आम्रकला डोंगरे, विना राजलक्ष्मी हरिनखेडे, उपाध्यक्ष सुनीता मंलगाम, बिरजूला तिडंके, पुष्पा भगत, सहसचिव अजंना ठाकरे, लालेश्वरी शरणागत, अर्चना मेश्राम, दुर्गा संतापे, शामकला मसराम, काचंन शहारे, मिनाक्षी राऊत, वंदना पटले यांनी केले.