लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कावराबांध येथील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यानी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यामुळे शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यानी परीक्षेवर बहिष्कार टाकला असून दररोज शाळेच्या प्रांगणात धरणे देत आहेत. मुख्याध्यापक आर. एन. डोहरे हटविण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.दहावी नंतर जास्तीत जास्त विद्यार्थ्याचा कल विज्ञान शाखेकडे असतो. ही बाब लक्षात घेत जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कावराबांध येथे ही स्वयं अर्थ सहायक तत्वावर मागील वर्षी विज्ञान शाखा उघडण्याची परवानगी जि.प.कडून घेऊन विज्ञान शाखा सुरु करण्यात आली. परिसरातील दहावी पास विद्यार्थ्याना उत्तम शिक्षण देण्याचे प्रलोभन देत प्रवेश घेण्यासाठी आकर्षित करण्यात आले.यंदा ११ वी आणि १२ वीचे वर्ग नियमितपणे सुरु झाले. शिक्षकांची नियुक्ती करताना अडचणी येत असताना तासीका तत्वावर काही शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. तर काही विषयासाठी माध्यमिक विभागातील शिक्षकांनी तासिका घेण्याची जवाबदारी घेतली. सर्व सुरळीतपणे सुरू असताना नव्याने रुजू झालेले मुख्याध्यापक आर.एन.डोहरे यांनी आपला मनमर्जी कारभार सुरू केल्याचा आरोप आहे. नियमित शिक्षकांना कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतून हटवून त्यांना प्राथमिक विभागाच्या तासिका देण्यात आल्या. तर १२ वीची बोर्डाची परीक्षा अवघ्या तीन महिन्यावर येवून ठेपली असून सुध्दा त्यांच्या तासिका होत नाही. त्यामुळे ११ वी १२ वीच्या विद्यार्थ्यानी प्रथम सत्र परीक्षेवर बहिष्कार टाकला आहे. नियमित कनिष्ठ व्याख्याताची सोय करुन पूर्ण तासिका घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. तसेच मुख्याध्यापक व प्राचार्य पदावर असलेले आर.एन.डोहरे यांना हटविण्याची मागणीचे निवेदन जि.प.शिक्षणाधिकारीव व सालेकसा येथील अधिकारी व पदाधिकाऱ्यांना दिले आहे.तासिकेत वारंवार फेरबदलमागील मुख्याध्यापक घरडे हे सत्र सुरु होण्याच्या वेळीच सेवानिवृत्त झाले असून सेवा ज्येष्ठतानुसार कनिष्ठ व्याख्याता आर.एन.डोहरे यांना हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय मिळून प्रभारी मुख्याध्यापक व प्राचार्य बनविण्यात आले. तेव्हा सुरुवातीला नेहमीप्रमाणे सर्व काही सुरळीत चालले. परंतु काही महिन्यावर त्यांना नियमित मुख्याध्यापकाचा आदेश जिल्हा परिषदेने दिले. वारंवार वेळापत्रक बदलण्याचे काम करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.नियमित शिक्षकांनी आधी अनुदानीत तुकडीवर पूर्ण तासिका घ्याव्यात. तसेच विज्ञान शाखा स्वयं अर्थसहाय्य तत्वावर असून त्यासाठी बाहेरुन तासिका पध्दतीवर शिक्षक नेमले जातील.विज्ञान शाखेत शिकवित असलेले नियमित शिक्षकांच्या तासिका बंद केल्या आहेत.विद्यार्थ्यांचे आरोप चुकीचे आहे.-आर.एन.डोहरे, मुख्याध्यापक,जि.प.हायस्कूल कावराबांध
विद्यार्थ्याचा परीक्षेवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:16 AM
जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कावराबांध येथील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यानी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यामुळे शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यानी परीक्षेवर बहिष्कार टाकला असून दररोज शाळेच्या प्रांगणात धरणे देत आहेत.
ठळक मुद्देअभ्यासक्रम अर्धवट : मुख्याध्यापकाला हटविण्याची मागणी