शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
2
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
3
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
4
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
5
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
6
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
7
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
8
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
9
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
10
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
12
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
13
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
14
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
15
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
16
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
17
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
18
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
19
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

नाटकाच्या आयोजनाला लागणार ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 9:53 PM

दिवाळीनंतर मंडई उत्सवाला सुरुवात होते. मंडईच्या निमित्ताने रात्रीला नाटक, दंडार, तमाशा, ड्रामा, आर्केस्ट्रा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हे कार्यक्रम रात्रभर सुरु असतात.

ठळक मुद्देअटीचे पालन करणे अनिवार्य : कर्कश आवाज करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवाळीनंतर मंडई उत्सवाला सुरुवात होते. मंडईच्या निमित्ताने रात्रीला नाटक, दंडार, तमाशा, ड्रामा, आर्केस्ट्रा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हे कार्यक्रम रात्रभर सुरु असतात. रात्री १०.३० वाजतानंतर कार्यक्रम बेकायदेशीरपणे सुरु ठेवणाऱ्या कलाकार व आयोजक मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मोहीम पोलीस विभागाने सुरु केली आहे.पूर्व विदर्भात दिवाळीनंतर गावा-गावात मंडई उत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवाच्या निमित्ताने रात्रीच्यावेळी लोकांमध्ये जनजागृती करणारे कार्यक्रम आयोजित केले जातात. आता मंडईची धूम सुरु होणार असल्याने गावागावातील तरुण या मंडईनिमित्त नाटक व इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्याची आखणी करतात. असे कार्यक्रम करणाºया मंडळावर व त्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काम करणाऱ्या कलाकारांवर गुन्हा दाखल करण्याची मोहीम जिल्हा पोलिसांनी सुरु केली आहे. अशा प्रकारच्या दोन कारवाया गोरगाव तालुक्याच्या कटंगी येथे करण्यात आल्या. कटंगी येथे शारदा नवयुवक नाट्य मंडळ कटंगी बुज तर्फे ९ नोव्हेंबरला ‘केव्हा येणार कुंकवाचा धनी’ या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आयोजकांनी तहसीलदार यांची रितसर परवानगी घेतली होती. परंतु त्या परवानगीत दिलेल्या अटी व शर्तीचे पालन न केल्यामुळे तेजेंद्र हरिणखेडे, मिलींद भाऊराव शहारे, ज्ञानेश्वर हरिणखेडे, दिनेश हरिणखेडे, हसीनलाल बघेले, सुरेश हरिणखेडे, प्रदीप हरिणखेडे, नरेंद्र पटले, हितेंद्र भगत, सोनू रहांगडाले, तुरेश रहांगडाले, दिलराज सिंगाडे, नूलचंद रहांगडाले, देवेंद्र हरिणखेडे, डॉ. विजय बघेले, उमेश अगरे,जगन भोयर, किसनलाल बिसेन, रोहीत हरिणखेडे, मुकेश बघेले, रविंद्र पटले, जितू रहांगडाले, ओमेश्वर रहांगडाले, राजेंद्र पटले, मिलींद शहारे, रुपचंद बोपचे, परमेश्वर पंधराम, अमोल सखाराम पानसे रा. नागभिड व त्यांच्या सहकलाकावर गोरेगाव पोलिसांनी भादंविच्या कलम १८८, १४३, सहकलम १३५ मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.कटंगी येथे याच दिवशी शारदा बाल गणेश मंडळ कटंगीतर्फे आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. रात्री १० नंतर हे कार्यक्रम सुरुच होते. परवानगी घेताना लिहून दिलेल्या हमीपत्राचे उल्लंघन केल्यामुळे रेखलाल टेंभरे, डॉ. योगेश हरिणखेडे, लालचंद टेंभरे, युगेश खरवडे, निलेश गट्टू गजघाटे, सुनील सोनवाने, संजय डोमळे, नरेंद्र दिहारी, अमीन अगवान, संदीप हरिणखेडे, अभय रहांगडाले, माणिकचंद रहांगडाले, रंजित हरिणखेडे, चंद्रशेखर रहांगडाले, खेमराज सोनवाने, प्रशांत शहारे, विनोद चौधरी, शुभम रहांगडाले, गजानन चोपकर, निलेश्वर चौरागडे, ओ.सी.शहारे, लिखीराम येळे, लालचंद चैतराम चव्हाण, जगदिश दर्यावसिंह पटले व त्याच्या सहकलाकांरावर भादंवीच्या कलम १८८, १४३, सहकलम १३५मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.