शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

गोंदियातील कालीसरार धरणाच्या भिंतीला तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 7:21 PM

सालेकसा तालुक्यातील कालीसरार धरणाच्या देखभाल दुरूस्तीकडे संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. धरणाच्या भिंतीचे लिकेज वाढल्याने पाण्याच्या अपव्यय होत असून धरण फुटण्याचा धोका सुध्दा वाढला आहे.

ठळक मुद्दे धरण फुटण्याची शक्यतारोजंदारी मजुराच्या भरवशावर धरणाची देखरेख

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राखीव जलसाठा ठेवून पिण्याच्या पाण्यासह शेतीला सिंचनासाठी संकटाच्या वेळी उपयोगी पडणारे सालेकसा तालुक्यातील कालीसरार धरणाच्या देखभाल दुरूस्तीकडे संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. धरणाच्या भिंतीचे लिकेज वाढल्याने पाण्याच्या अपव्यय होत असून धरण फुटण्याचा धोका सुध्दा वाढला आहे.महाराष्ट्र छत्तीसगडच्या सीमेलगत बिजेपार ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेल्या कालीसरार धरण आहे. या धरणा खालून वाहणारा नाला सालेकसा आणि देवरी तालुक्याला विभाजीत करतो. अतिसंवेदनशील भागात असलेला या प्रकल्पातून पाणी सिंचन करण्यासाठी स्वतंत्र कालवे नसून या धरणाच्या पाण्याची गरज पडल्यास ते पाणी सरळ पुजारीटोला धरणात सोडले जाते व गरजेनुसार पाण्याचे वितरण केले जाते. परंतु या धरणाच्या देखभाल दुरूस्तीकडे सतत दुर्लक्ष होत असल्याने येथील पाणी वापरात कमी व वाया जास्त जाते.

लाख मोलाचे पाणी दरवर्षी उपयोग विना सुध्दा संपून जाते. परंतु बाष्पीभवन होऊन पाणी कमी झाले असे उत्तर येथील संबंधित विभागाचे कर्मचारी देतात. एखाद्या वर्षी येथील पाण्याचा उपयोग केला नाही तरी पाण्याची पातळी अगदी ३० ते ३५ टक्के पर्यंत खाली येते. अर्थात लिकेजमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते हे कुणीच नाकारु शकत नाही. परंतु लिकेजकडे सतत दुर्लक्ष केल्यास धरण फुटण्याचा सुध्दा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.कालीसरार धरणाला एकूण चार दरवाजे असून एक टीएमसी पेक्षा जास्त पाणी साठवण करण्याची क्षमता या धरणात आहे. जेव्हा या धरणातून पाणी सोडले जाते तेव्हा डाव्या बाजूच्या भिंतीला असलेल्या लिकेजमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो.

अशात लिकेज आणखी मोठा झाला तर धोका ही वाढेल. येथील पाणी सुरक्षित राहिले तर दोन्ही हंगामात दोन हजार हेक्टर शेतीला भरपूर पाणी सिंचन होईल एवढ्या पाण्याची मदत कालीसरार धरणातून पुजारीटोला धरणाला मिळू शकेल. कालीसरारचे पाणी विशेष करुन पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवले जाते. परंतु उन्हाळा येईपर्यत धरण अनेकदा रिकामे होते. अशात या धरणाचे पाणी शेवटपर्यंत संग्रहीत व सुरक्षित राहावे म्हणून प्रयत्न केले पाहिजे. नक्षलग्रस्त भागात असलेल्या या धरणाच्या देखभाल दुरूस्तीकडे लक्ष देणे सुध्दा आवश्यक आहे.

टॅग्स :Damधरण