आॅनलाईन लोकमतगोंदिया : रोपवाटीकेत पुढेही काम करू देण्यासाठी १२०० रूपयांची मागणी करून रक्कम स्वीकारणाऱ्या वनरक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या येथील पथकाने रंगेहात पकडले. जवळील ग्राम खमारी येथील रोपवाटिकेत सोमवारी (दि.१२) सकाळी १० वाजता दरम्यान ही कारवाई करण्यात केली. अँथोनी निकोलस सायमन (५२) असे लाचखोर वनरक्षकाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार तक्रारदार या खमारी येथील रोपवाटिकेत १९ फेब्रुवारी २०१८ पासून मजुरीचे काम करीत आहेत. ३ मार्च रोजी त्या रोपवाटिकेत काम करीत असताना वनरक्षक सायमन याने त्यांना जून महिन्यापर्यंत काम करावयाचे असल्यास १२०० रूपयांची मागणी केली. अन्यथा कामावरून कमी करणार असल्याचे म्हटले. यावर मात्र तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात शुक्रवारी (दि.९) तक्रार नोंदविली. तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने खमारी येथील रोपवाटिकेत सोमवारी (दि.१२) सापळा लावला.यात वनरक्षक सायमन याने तक्रारदारांना एक हजार २०० रूपयांची मागणी करून पंचांसमक्ष रक्कम स्वीकारली असता पथकाने त्यांना रंगेहात पकडले. सायमन विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात लाप्रका. कलम ७,१३(१) सहकलम १३(२) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
लाचखोर वनरक्षकास रंगेहात पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:25 AM
रोपवाटीकेत पुढेही काम करू देण्यासाठी १२०० रूपयांची मागणी करून रक्कम स्वीकारणाऱ्या वनरक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या येथील पथकाने रंगेहात पकडले.
ठळक मुद्दे१२०० रूपयांची लाच स्वीकारली : खमारी येथील कारवाई