शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

उज्ज्वलाने पेटविल्या ३६ हजार घरातील चुली

By admin | Published: July 01, 2017 12:12 AM

चूल पेटविण्यासाठी ग्रामीण भागातील महिला वृक्ष तोडून त्याचा वापर सरपणासाठी करीत होत्या.

पालकमंत्र्याची माहिती: २ लाख ७५ हजार वीज जोडण्या लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : चूल पेटविण्यासाठी ग्रामीण भागातील महिला वृक्ष तोडून त्याचा वापर सरपणासाठी करीत होत्या. चूल फुकता-फुकता त्यांच्या डोळ्यांना अंधत्वही येत होते. हे टाळण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनेतून ३६ हजार ५७८ लोकांना उज्ज्वला योजनेतून गॅस दिल्या आहेत. लोकोपयोगी कामे करण्यासाठी मागील तीन वर्षात केंद्र सरकार व अडीच वर्षापासून राज्यसरकार झटत आहे. स्डँड अप इंडियाच्या माध्यमातून नविन भारत घडविले जात असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री व सामाजिक न्याय तथा विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. स्थानिक कन्हारटोलीच्या पवार बोर्र्डींग येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. संजय पुराम, विजय रहांगडाले, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, माजी आ. केशवराव मानकर, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे उपस्थित होते. पालकमंत्री पुढे म्हणाले, केंद्र सरकारने नोटबंदी, जीएसटी असे आमूलाग्र उपक्रम आणून देश घडविण्याचा उपक्रम सुरू केला. मुद्रा लोनच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार उभे करण्याची संधी उपलब्ध करून दिली. गोंदिया जिल्ह्यात ३४ हजार ७४७ बेरोजगारांसाठी १२४ कोटी मुद्रालोन उभा करून १२१ कोटी वाटले आहेत. शहरी पंतप्रधान घरकूल योजनेतून याचा लाभ ६ हजार ६०७ लोकांना दिला आहे. गोंदिया शहरात २७५१ शौचालय तयार करण्याचे उद्दीट्ये होते त्यातून २४९३ शौचालयाचे काम पूर्ण झाले आहे. तिरोडा शहरात १७२५ शौचालय तयार करण्याचे उद्दीट्ये होते त्यातून ९९६ शौचालयाचे काम पूर्ण झाले आहे.जिल्ह्यातील ३७ हजार ५९८ लोकांनी पीकविमा उतरविला आहे. मागच्या वर्षी क्राप लोन ४५ टक्के घेण्यात आलले होते. यंदा ही टक्केवारी वाढवायची आहे. कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत सन २०१६-१७ या वर्षात १०२० तरूण-तरूणींना प्रशिक्षण दिले. तर २०१७-१८या वर्षात ५ हजारापेक्षा अधिक मुला-मुलींना प्रशिक्षण देण्याचा माणस आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी सरकाच्या काळात गोंदिया जिल्ह्यात २३ हजार लोकांची वीज जोडणी केली होती. परंतु आम्ही अडीच वर्षाच्या काळात २ लाख ७५ वीज जोडण्या केल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात १२४ कोटीतून ३१ केव्हीचे ८ ठिकाणी ट्रान्सफार्मर बसविले आहेत. धडक सिंचन योजनेतून गोंदिया जिल्ह्याला ३ हजार विहीरी मागच्या वर्षी देण्यात आल्या. सर्व मामा तलावांचे खोलीकरण करून ४०० तलाव सिंचनासाठी घेतले आहेत. पुढच्या वर्षी १४०० तलावांचे खोलीकरण करण्यात येणार आहे. खाऱ्यापाण्यात ३५ टक्के मासेमारी केली जाते परंतु तेथील मासेमारी करणाऱ्यांना एक लाखाचे कर्ज दिले जाते तर गोळ्या पाण्यात ६५ टक्के मासेमारी होत असूनही फक्त ३० हजार रूपये कर्ज दिले जाते. गोळ्यापाण्यातील मासेमारी करणाऱ्यांना एक लाखापर्यंत कर्ज देण्यासाठी शासन विचार करीत आहे. देशातील सर्वात मोठी कर्जमुक्ती महाराष्ट्र सरकारने केली असल्याचे बडोले म्हणाले.