शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

शोषित-वंचितांना मुख्य प्रवाहात आणणार

By admin | Published: March 31, 2017 1:27 AM

गावातील गरजू लाभार्थी शासनाच्या कोणत्याही योजनांपासून वंचित राहणार नाहीत, याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी.

नाना पटोले : ४८ लाभार्थ्यांना वनविभागाच्यावतीने गॅस वाटपबोंडगावदेवी : गावातील गरजू लाभार्थी शासनाच्या कोणत्याही योजनांपासून वंचित राहणार नाहीत, याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. महिला-भगिनींना आरोग्याचा, चुलीतील धुराचा त्रास कमी व्हावा म्हणून वनविभागामार्फत गॅस वाटप केले जात आहे. सन २०१९ पर्यंत गावातील कोणताही गरजू लाभार्थी घरकुलापासून वंचित राहणार नाही. समाजातील प्रत्येक शोषित-वंचितांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा आपला प्रयत्न आहे, असे प्रतिपादन खा. नाना पटोले यांनी केले.अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्र कार्यालय व संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त वतीने सार्वजनिक रंगमंदिरात गॅस वितरण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी नवेगावबांधचे प्रकष्ठ निष्कासन अधिकारी व्ही.जी. उदापुरे होते. अतिथी म्हणून तहसीलदार डी.सी. बोंबार्डे, ठाणेदार नामदेव बंडगर, वनपरिक्षेत्राधिकारी सी.जी. रहांगडाले, इण्डेन गॅसचे संचालक अशोक चांडक, जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे, सरपंच राधेश्याम झोळे, उपसरपंच वैशाली मानकर, हिंदू समाज संघटनेचे अध्यक्ष देवलाल मानकर, सचिव रत्नाकर बोरकर, माजी पं.स. सदस्य प्रमोद पाऊलझगडे, वन समितीचे अध्यक्ष डॉ. शामकांत नेवारे उपस्थित होते.खा. पटोले पुढे म्हणाले, गावचा सर्वागिण विकास साधण्यासाठी गावाला जोडणारे रस्ते उत्तम दर्जाचे असणे आवश्यक आहे. गावात होणाऱ्या विकास कामाचा निधी हा समस्त जनतेचा आहे. त्या निधीचा योग्य उपयोग होतो काय, याकडे ग्रामस्थांना लक्ष देणे गरजेचे आहे. बीपीएल असो वा नसो आता यापुढे गरजवंतांना प्रधानमंत्री घरकूल योजनेचा लाभ मिळणार आहे. कोणताही व्यक्ती राहत्या घरापासून वंचित राहणार नाही. गावकऱ्यांनी ग्रामसभेच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे. जे लोक अन्नधान्यापासून वंचित होते त्यांनाही आज अन्नधान्याचा लाभ मिळत आहे. विकासाच्या प्रक्रियेत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन खा. नाना पटोले यांनी केले. तहसीलदार बोंबार्डे यांनी, पर्यावरणाचा समतोल टिकवून ठेवणे आवश्यक आहे. वनविभागाच्या वतीने प्राप्त होणाऱ्या गॅस वाटपाने महिलांचे आरोग्य निश्चित चांगले राहील, असा आशावाद व्यक्त केला. उदापुरे यांनी, दिवसेंदिवस वनाची संख्या कमी होत आहे. जंगलतोड राहिली तर वाळवंटासारखी परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. आपल्या गावाजवळचे जंगल सुरक्षीत राहावे, लाकडे जाळली जावू नये म्हणून गॅस कनेक्शनचे वाटप केले जात आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाणार असल्याचे ते म्हणाले. ठाणेदार बंडवार यांनी, वनविभागाच्या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली. याप्रसंगी गावातील अनुसुचित जातीच्या ४८ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. वन समितीचे अध्यक्ष डॉ. शामकांत नेवारे यांनी ओबीसी लाभार्थ्यांना गॅस वाटप करण्यासाठी कार्यवाहीची मागणी मांडली. संचालन वन समितीच्या उपाध्यक्ष दीपिका गजभिये यांनी केले. आभार वन समितीचे सचिव तथा क्षेत्र सहाय्यक धुर्वे यांनी मानले. याप्रसंगी वन समितीच्यावतीने खा. नाना पटोले, तहसीलदार बोंबार्डे, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी उदापुरे, ठाणेदार नामदेव बंडगर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.