शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
3
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
4
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
5
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
6
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
7
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
8
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
9
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
10
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
11
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
13
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
14
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
15
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
16
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
17
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
18
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
19
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
20
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."

पाण्यासाठी भावाने घेतला जीव

By admin | Published: February 12, 2017 12:47 AM

थोरला भाऊच ठरला कर्दनकाळ : आईच्या वाट्याची शेती कारणीभूत

अमरचंद ठवरे   बोंडगावदेवी समाजात भावाच्या नात्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. परस्परांच्या सुख दु:खात झोकून देऊन एकत्र येणारे नाते भावांचे समजले जाते. वैयक्तिक मतभेद असले तरी संकटकाळी भावाच्या मदतीला धावून जाणारे बंधूप्रेम आजही समाजात जिवंत आहे. परंतु जमिनीच्या हिस्सा वाटणीवरून पराकोटीला गेलेले वैरत्व जीवावर बेतले आहे. थोरल्या भावाने धाकट्या भावाला यमसदनी पाठविण्याचे क्रूरकृत्य केले. ही घटना गुढरी या खेडेगावातील शेतशिवारात ४ फेब्रुवारीला दिवसाढवळ्या घडली. बोअरवेलचे पाणी वापरण्याचा माझा दिवस आहे, असे म्हणत सुरू झालेल्या या भांडणामध्ये गळा आवळून लहान भावाची हत्या केल्याची कबुली मोठ्या भावाने पोलिसांना दिली. गणेश रुखमोडे (३८) या लहान भावाची हत्या केल्याच्या आरोपावरून जनार्धन रुखमोडे (४२) यास पोलिसांनी अटक केली आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील भंडारा जिल्ह्याच्या सीमानजीक असलेले गुढरी हे छोटेशे गाव. तुकाराम यांना गोवर्धन, जनार्धन, गणेश असे तीन मुले. तिघांचेही लग्न होऊन आप-आपल्या वैवाहिक जीवनात रमले. मृतकाला अपंग असलेला १२ वर्षाचा एक मुलगा आहे. गुढरी या गावात रुखमोडे परिवाराची १५ एकर जमीन आहे. वडीलांच्या हयातीमध्ये सदर शेतामध्ये एक बोअर खोदण्यात आली होती. गावामध्ये या तिघाही भावाची प्रशस्त अशी इमारत आहे. सन २०१० मध्ये वडीलाचे निधन झाले. मृतक गणेश हा ट्रक चालवित होता. बऱ्याच वर्ष तो साकोलीला राहायचा. १५ एकर शेतजमीनीचा कारभार जनार्धन सांभाळायचा. घरची परिस्थिती सुधारण्यामध्ये ड्रायव्हर असलेला गणेशची फार महत्वाची भूमिका होती. साकोलीला वास्तव्यानी असतानी गणेशचा मुलाला पतंग खेळतानी विजेचा शॉक लागला. तो शॉकच जिवनातून उठणारा ठरला, शर्तीचे प्रयत्न करून मुलगा आजही पाय व हाताविना खाटेवरच पडून राहतो. मुलाच्या या अवस्थेने मृतक गणेशने गुढरी गावची वाट धरली. अख्या कुटूंबाचे सूत्र आपल्याकडे घेतले. ट्रक चालविण्याची नोकरी सोडून शेतीच्या कामात स्वत:ला झोकून दिले. घराचा कारभार लहान भावाकडे गेल्याने जनार्धनला खटकत होते. त्यामुळे काही वर्षापूर्वी तिघाही भावांचे शेतजमीन व घरातील खोल्यांचे हिस्से वाटे झाली. तिघेही एकमेकांपासून वेग-वेगळे राहायला लागले. वडीलांचे निधन झाल्यामुळे आईने लहान मुलात मृतक गणेशकडे राहणे पसंत केले. १५ एकर जमीनीचे वाटप तिघांनी भावांना प्रत्येकी ४ एकर प्रमाणे व आईच्या वाट्याला ३ एकर अशी जमिनीची वाटणी करण्यात आली. ज्या बांधीमध्ये वडिलोपार्जीत बोअर खोदण्यात आला होता. ती बांधी जनार्धनच्या वाट्याला गेली. आई गणेशमध्ये राहत असल्याने आईच्या हिस्याची ३ एकर जमीन गणेश करायचा. आईच्या हिस्य्याची शेतजमीन जनार्धनला सतावत होती. घटनेच्या दिवशी ४ फेब्रुवारी सकाळी ६ वाजता े मृतक गणेश शेतामध्ये उन्हाळी धानाच्या रोपाला पाणी वागविण्यासाठी मफलर बांधून गेला. त्याच्या मागो-माग जनार्धन सुध्दा गेला. पाणी वापरण्यावरून दोघा भावांमध्ये वाद झाला. आज तुझा दिवस पाणी वागवण्याचा नाही असे बोलून त्यांच्यात बोअरवेलच्या बांधीमध्ये मारहाण झाली. खून केल्यानंतर आरोपी इलेक्ट्रीक मोटार दुरूस्त करण्यास बसला. काही वेळाने गावातील एकजन घरी आला व मोटार दुरूस्तीसाठी त्याला शेतामध्ये घेऊन गेला. त्याची मोटारदुरूस्त करून जनार्धन घरी आला. नंतर गणेशच्या मृत्युची बातमी गावात पसरल्याने जनार्धन सुध्दा शेतामध्ये गेला. दोन्ही भावांमध्ये झालेलल्या मारहाणीचे व्रण जनार्धनच्या अंगावर दिसले. - हत्येसाठी मदत कुणाची? गणेशला जिवानिशी मारून प्रेत काही अंतरावरील नालीत ठेवण्यात आला. या कृत्यात अन्य दुसरा कुणी सहभागी तर नाही ना? अशी चर्चा गुढरी गावात आहे. भावाची हत्या करण्यामध्ये जनार्धने गावातील कुणाचे सहकार्य घेतले तर नाही याचाही पोलीस तपास करीत आहेत. यासंबंधी गावातील एका व्यक्तीला सदर हत्या प्रकरणी विचारपूर करण्याचाही प्रयत्न पोलीस सूत्रांकडून झाल्याचे समजते. ७० फूट मृतदेह ओढत नेला ४मारहाणीत दोघेही भाऊ हाताबुक्यांनी मारू लागले. बांधीमध्ये खाली पाडून गणेशला मारहाण केली. गणेश खाली पडताच त्याच्या गळ्यात असलेला मफलर जनार्धनने आवळला. जनार्धन घाबरला काही क्षणात गणेशचा मृत्यू झाला. हे कृत्य आपल्यावर येवू नये म्हणून गळ्यातील मफलरने बांधीतून ओढत नेवून अंदाजे ७०-८० फुट अंतरावरील असलेल्या पाणी जाणाऱ्या नालीमध्ये जनार्धनने गणेशचे प्रेत टाकले. लुंगी-बनियानवर असलेला जनार्धन ओल्या कपड्यातर पायी घरी आला. तीन एकर शेती खटकत होती ४आईच्या हिस्याची ३ एकर शेती मृतक गणेश जवळ होती. आईच्या चरितार्थासाठी ३ एकर शेती देण्यात आली होती. ती शेती गणेश करायचा आईला खाण्यासाठी ३ एकराचे धान लागत नाही असे जनार्धनला वाटत होते. यासंबधी जनार्धनचे आईसोबत नेहमी खटके उडायचे. तुला तेवढ्या जमिनीचे धान लागत नाही. तुला आम्ही धान देऊ, जमीन वाटप कर अशी दमदाटी पिंजऱ्यात असलेला जनार्धन वारंवार आईला देत होता. आमच्या पेक्षा याला जमीन जास्त आहे, अशी इर्षा जनार्धनच्या मनात होती. अर्जुनी-मोरगाव पोलीस स्टेशन येथे जनार्धन तुकाराम रुखमोडे (४२) याच्या विरूध्द भादंविचे कलम ३०२ (खून), २०१ (पुरावा नष्ट करणे) अन्वये अटक करण्यात आली. तपास देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलसिंह सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माणिक खरकाटे, पोलीस नायक रेखलाल गौतम, पोलीस शिपाई शिंदे, कोरे, निकोडे करीत आहेत.