लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : येथील बीएसएनएल कार्यालयात प्रभारी कनिष्ठ अभियंता निकेश कनोजे महिन्यातून केवळ एकदाच येतात. त्यामुळे तांत्रिक दिलीपकुमार पारधी व मजुरांच्या भरवशावर मुख्य कार्यालय व उपशाखा चोपा, बबई, सोनी व मुंडीपार, पालेवाडा, बबई, सोनी, तुमखेडा, कवलेवाडाच्या मोबाईल टॉवरची देखरेख करावी लागत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएनएल विभागाव्दारे १५० लँडलाईन टेलीफोन, ७५ नेटब्रॉड गेज, पाच लिंक लाईन यात महाराष्ट्र बँक, रजिस्टर कार्यालय, को-आॅपरेटिव्ह बँक, भंडारा को-आॅपरेटिव्ह बँक, सेतू विभागाची कामे या विभागाव्दारे चालतात.त्याकरिता एक कनिष्ठ अभियंता कनोजे यांना प्रभार देण्यात आला. तांत्रिक कामे पाहण्यासाठी दिलीपकुमार पारधी, चौकीदार व कुऱ्हाडी येथे एका तांत्रिकाची नियुक्ती करण्यात आली आहे.परंतु कनिष्ठ अभियंता कनोजे हे कार्यालयात महिन्यातून एकदाच येत असल्याने ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील बीएसएनएल सेवा १० दिवसांपासून बंद पडली होती. यामुळे बँका, सेतू कार्यालयात सेवा विस्कळीत होती. तांत्रिक कर्मचाऱ्यांनी २० जुलै रोजी दुरु स्ती केल्याने पुन्हा कार्यालय, बँक, सेतूची कामे सुरु झाल्याची माहिती तांत्रिक कर्मचारी पारधी यांनी दिली.बँक व सेतू कार्यालय या महत्वाच्या ठिकाणी लिंक नसल्यास ग्राहक, नागरिक व विद्यार्थ्यांना फटका बसतो. यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी नियमित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी कनिष्ठ अभियंता कनोजे यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी मोबाईलवर रिंग जावूनसुद्धा प्रतिसाद दिला नाही. या प्रकारावरून बीएसएनएल विभागाच्या कामाची पावती ग्राहकांना मिळत आहे. मात्र यात नागरिकांची फसगत होत आहे.
बी.एस.एन.एल. कार्यालय चालते तांत्रिकाच्या भरवशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 10:24 PM
येथील बीएसएनएल कार्यालयात प्रभारी कनिष्ठ अभियंता निकेश कनोजे महिन्यातून केवळ एकदाच येतात. त्यामुळे तांत्रिक दिलीपकुमार पारधी व मजुरांच्या भरवशावर मुख्य कार्यालय व उपशाखा चोपा, बबई, सोनी व मुंडीपार, पालेवाडा, बबई, सोनी, तुमखेडा, कवलेवाडाच्या मोबाईल टॉवरची देखरेख करावी लागत आहे.
ठळक मुद्देकर्मचारी नियुक्तीची मागणी : प्रभारी कनिष्ठ अभियंत्याचे दुर्लक्ष