कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लाखोंच्या घरात पोहचलेली वीज बिलाची थकबाकी बीएसएनएलच्या (भारतीय दूर संचार निगम) चांगलीच अंगलट आली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने जिल्ह्यातील बीएसएनएलच्या एक्सचेंज व टॉवरची बत्ती गुल केली आहे. यामुळे मात्र बीएसएनएलचा कारभार किती बिकट झाला आहे याची प्रचिती येत आहे.यातील काही एक्सचेंज व टॉवरची पैसे भरल्यानंतर वीज जोडणी करण्यात आली असली तरी आजही मोठ्या संख्येत टॉवरची बत्ती गुलच आहे.खाजगी दूरसंचार क्षेत्रात आज चांगलीच स्पर्धा निर्माण झाली आहे. मात्र शासन अखत्यारित असलेल्या बीएसएनएलकडून अद्यापही चांगल्या सुविधेची अपेक्षा बाळगून मोठ्या प्रमाणात ग्राहक बीएसएनएलने जुळले आहेत. मात्र असे असतानाही ग्राहकांची अपेक्षापूर्ती होत नसून ‘नाम बडे और दर्शन खोटे’ ही स्थिती बीएसएनएलची दिसून येत आहे. हाच प्रकार बीएसएनएलच्या आर्थिक व्यवहारांबाबतही आता बघावयास मिळत आहे.बीएसएनएलवर वीज वितरण कंपनीची लाखो रूपयांची थकबाकी झाल्याची माहिती असून यातूनच महावितरणने बीएसएनएलच्या एक्सचेंज व टॉवरची बत्ती गुल करण्यास सुरूवात केली आहे. यांतर्गत महावितरणने जिल्ह्यातील सर्वच तालुकास्तरावर थकबाकी असलेल्या बीएसएनएल एक्सचेंज व टॉवरचा पुरवठा खंडीत करण्यास जानेवारी महिन्यापासून सुरूवात केली आहे.यांतर्गत सद्यस्थितीत आमगाव तालुक्यातील रिसाम व तिगाव हे दोन टॉवर वीज बिलाचा भरणा केल्यामुळे सुरू झाले असून उर्वरीत तालुक्यांतील बहुतांश टॉवरची आजही बत्ती गुल झालेलेली आहे.महावितरणच्या या कारवाईमुळे याचा परिणाम मोबाईल सेवेवरही होत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, शहरातील सुभाष बागेच्या बाजूच्या बीएसएनएल कार्यालयाची सुमारे १ लाख रूपयांची थकबाकी असल्याने येथील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. तर सालेकसा येथील एक्सचेंजची सुमारे ९४ हजार रूपयांची थकबाकी असल्याने तेथीलही वीज पुरवठा खंडीत करण्यात आला असल्याची माहिती आहे.पैसे भरल्याने केली जोडणीवीज वितरण कंपनीने दणका दिल्यानंतर आता बीएसएनएलचे धाबे दणाणले असून वीज बिल थकबाकीचे पैसे भरण्यास सुरूवात केली आहे. यामुळे महावितरणने गोंदिया ग्रामीण मधील मुंडीपार व पांढराबोडी येथील दोन्ही टॉवरची सुमारे ५० हजार रूपयांची थकबाकी भरली. तिरोडा तालुक्यातील तिरोडा येथील एक्सचेंजचे सुमारे ५ लाख रूपये व वडेगाव येथील टॉवरचेही पैसे भरण्यात आले.आमगाव तालुक्यातील रिसामा व तिगाव येथील टॉवरची थकबाकी भरण्यात आल्याने त्यांची वीज जोडणी करण्यात आली आहे.
बीएसएनएलची बत्ती झाली गुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 10:27 PM
लाखोंच्या घरात पोहचलेली वीज बिलाची थकबाकी बीएसएनएलच्या (भारतीय दूर संचार निगम) चांगलीच अंगलट आली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने जिल्ह्यातील बीएसएनएलच्या एक्सचेंज व टॉवरची बत्ती गुल केली आहे. यामुळे मात्र बीएसएनएलचा कारभार किती बिकट झाला आहे याची प्रचिती येत आहे.यातील काही एक्सचेंज व टॉवरची पैसे भरल्यानंतर वीज जोडणी करण्यात आली असली तरी आजही मोठ्या संख्येत टॉवरची बत्ती गुलच आहे.
ठळक मुद्देथकबाकी आली अंगलट : एक्सचेंज व टॉवरवर संकट, ग्राहकांना फटका