लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : तथागत गौतम बुद्धांचा धम्म शांती, अहिंसा, करुणा, मैत्री, बंधुभाव या पंचतत्त्वावर आधारित आहे. विज्ञानाच्या कसोटीवर चिकित्सक पद्धतीने बुद्धाच्या धम्माची मांडणी केली आहे. शाश्वत सत्याचा शोध घेण्यासाठी सिद्धार्थ गौतमाने राजपाठ त्याग केला. विज्ञानाच्या कसोटीवर आधारलेल्या बुद्ध धम्मानी जगातील काही देशांनी यशोशिखर गाठले. बुद्धांच्या मार्गाचा दैनंदिन व्यवहारात अंगिकार केल्यास निश्चितच मानवी जीवनाचे कल्याण होणार.बुध्द विहारात वैचारिक देवाण-घेवाण व्हावी. धम्म संस्काराचे परिपाठ व्हावे, गावात निर्माण झालेले बुध्दविहार सामाजिक, शैक्षणिक परिवर्तनाचे केद्र बनावे,असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले. जवळच्या खांबी व संविधान चौक अर्जुनी-मोरगाव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून आयोजित भिमज्योत प्रज्वलीत कार्यक्रमात ते बोलत होते.सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रासमोर दीप प्रज्वलन करुन पंचशील ध्वज फडकावून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे उद्घाटन करण्यात आले. बडाले म्हणाले, डॉ. बाबाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुध्द शांतीप्रिय व विज्ञानाच्या कसोटीवर उतरणारा करुणामय बौध्द धम्म समस्त मानवाला दिला.देशातील तमाम वंचित समुदयाचा सर्वागिण उद्धार करताना बाबासाहेबांनी मुक् याला बोलके, आंधळयाला डोळस, बहिऱ्यांना मार्ग दाखविले.तथागताच्या धम्माच्या परिचय संविधानातून समस्त भारतवासीयांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले. भारतीय संविधानाने विविध जाती धर्माच्या समुदायांना एकात्मतेच्या धाग्यात बांधले आहे. त्यामुळे अशी अप्रतिम घटना कोणीही बदलविण्याची हिंमत करणार नाही असे त्यांनी आवर्जून सांगितले.या वेळी नगराध्यक्ष किशोर शहारे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, नाना शहारे, सोनदास गणवीर, बाजीराव तुळशीकर, दानेश साखरे, पुजाराम जगझापे, डॉ. भारत लाडे, नायब तहसीलदार मुनेश्वर गेडाम, वंदना जांभुळकर, वंदना शहारे, मनोहर शहारे उपस्थित होेते. धम्मज्योत प्रज्वलन प्रसंगी बौध्द उपासक-उपासिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन नागेंद्र खोब्रागडे यांनी केले.
बुद्धविहार सामाजिक परिवर्तनाचे केंद्र व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:52 AM
तथागत गौतम बुद्धांचा धम्म शांती, अहिंसा, करुणा, मैत्री, बंधुभाव या पंचतत्त्वावर आधारित आहे. विज्ञानाच्या कसोटीवर चिकित्सक पद्धतीने बुद्धाच्या धम्माची मांडणी केली आहे. शाश्वत सत्याचा शोध घेण्यासाठी सिद्धार्थ गौतमाने राजपाठ त्याग केला.
ठळक मुद्देराजकुमार बडोले : धम्मचक्र प्रवर्तनदिन कार्यक्रम