गोंदिया : जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक सोमवारी (दि.१) राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय रेलटोली येथे पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने मार्गदर्शक म्हणून आमदार राजेंद्र जैन उपस्थित होते. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, प्रदेश प्रतिनिधी देवेंद्रनाथ चौबे, महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, जि.प. पक्षनेता गंगाधर परशुरामकर, माजी नगराध्यक्ष सुशीला भालेराव, जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष किशोर तरोणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना आ.जैन यांनी केंद्र व राज्य सरकार वर टिका करतांना जिल्ह्याच्या विकासाचा शासनाला विसर पडल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या धानाला भाव मिळत नाही. विद्युत बिल वाढल्यामुळे महिलांच्या घरचा बजेट बिघडला आहे. दोन वर्षामध्ये केंद्र व राज्य सरकारकडून नवयुवकांना कोणताही रोजगार न मिळाल्याचे सांगितले. तसेच वाढत्या महागाईमुळे महिलामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्ष वाढविण्याकरिता तसेच पक्षाशी नवीन सामाजिक लोकांना जोडण्याकरिता सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी कार्य करावे असे आवाहन केले. बैठकीत जास्तीत-जास्त कार्यकर्ते जोडण्यासाठी आवाहन करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा महिला अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर यांनी तर व आभार माजी नगराध्यक्ष सुशीला भालेराव यांनी मानले. या बैठकीत नवीन जिल्हा महिला कार्यकारिणी गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला व नवीन तालुका अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये नवीन तालुका अध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यात गोंदिया तालुका झोन १ राखी ठाकरे, गोेरेगाव तालुका सीमा संजय पटले, आमगाव तालुका कविता रहांगडाले, सडक अर्जुनी रजनी योगीराज गिऱ्हेपुंजे, अर्जुनी-मोरगाव शिशुला हलमारे, देवरी तालुका पारबता भैय्याला चांदेवार, सालेकसा पूजा वरकडे, तिरोडा तालुका गायत्री चंद्रकांत साबळे तसेच जिल्हा कार्यकारिणी वर सचिव म्हणून चित्ररेखा योगराज मिश्रा व उपाध्यक्ष म्हणून निर्मला नामदेवराव ईश्वार यांची नियुक्ती करुन आ.जैन यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. बैठकीला प्रामुख्याने नागदेव डोंगरवार, के.बी. चव्हाण, आशा पाटील, यशवंत गणवीर, राजेश तुरकर, कुंदा दोनोडे, कुंदा चंद्रीकापुरे, किर्ती पटले, रजनी गौतम, सुनीता मडावी, प्रिती रामटेके, दुर्गा तिराले, उषा किंदरले, सिंधू भुते, चंद्रकला सहारे, लक्ष्मी येळे, अनिता तुरकर, संगीता ब्राम्हणकर, कविता रहांगडाले, मिना किशोर पारधी, ममता डोंगरवार, भाग्यश्री मोहतुरे, निर्मला ईश्वर, सुनीता कुंवरप्रसाद जायस्वाल, उषा रामटेके, रंजू अगडे, रजनी गिऱ्हेपुंजे यांच्यासह अनेक महिला होत्या. (जिल्हा प्रतिनिधी)
सरकारने वाढविलेल्या महागाईने बिघडविले महिलांचे बजेट
By admin | Published: August 02, 2016 12:29 AM