प्राप्त माहितीनुसार, गणेशनगर येथील गोपालक बळीराम बाळबुद्धे जनावरांना चारायला जात होते. संविधान चौकात नगरपंचायतद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी जलयंत्र लावण्यात आले असून ३ वर्षांआधी लावल्यापासून ते बंद आहे. या यंत्रासाठी वीज खांब लावण्यात आले असून खांबातील वीज गळतीमुळे सभोवताल पसरलेल्या पाण्यात विजेचा प्रवाह होता. चरायला जात असणाऱ्या जनावरांपैकी एक म्हैस खांबाजवळ गेली व विजेच्या धक्क्याने ती जागीच मरण पावली. हा प्रकार बघून बाळबुद्धेनी तिकडे धाव घेतली असता त्यांचे पाय पाण्यात जाताच त्यांना विजेचा धक्का बसला. मात्र ते कसेबसे पाण्याबाहेर निघाल्याने थोडक्यात बचावल्याने जीवित हानी टळली. घटनेची नोंद पशुवैद्यकीय विभाग, पोलीस ठाणे आणि वीज विभागाने घेतली आहे. तर झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी बाळबुद्धे यांनी केली आहे.
विजेच्या धक्क्याने म्हैस ठार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 4:27 AM