सुकडी डाकराम : गावागावातून जनजागृतीच्या माध्यमातून लोकचळवळ उभी करा तरच पोषण, कुपोषण महा सप्ताह साध्य होईल, असे मत गोंदिया जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण विभाग) तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय गणवीर यांनी व्यक्त केले.
कुपोषण अभियान सप्ताहाच्या एकदिवसीय महिला मेळाव्याला ते मार्गदर्शन करीत होते. श्री चक्रधर स्वामीच्या पावनभूमीमध्ये स्थानिक जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या पटांगणावर एकदिवसीय कुपोषण अभियान महासप्ताहाच्या वतीने महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. जि.प. गोंदिया, एकात्मिक बालविकास प्रकल्प तिरोडा, अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत सुकडी डाकरामच्या वतीने एकदिवसीय पोषण अभियान महा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. सरपंच जयश्री गभणे, तिरोडा पं.स.चे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी चौधरी, जि.प.चे महिला व बालविकास विस्तार अधिकारी जाधव, तिरोडा एकात्मिक बालविकास गट प्रवर्तक साजन, प्राचार्य जाधव, केंद्रप्रमुख जी.एफ.अंबुले, तिरोडा तालुका काँग्रेसचे अनु.जाती विभागाचे अध्यक्ष हितेंद्र जांभूळकर, केंद्र मुख्याध्यापक ठाकरे, ग्रा.पं. सदस्य जयश्री चंद्रिकापूरे, उषा बिसेन, ग्रामसेविका कटरे, माविमचे गटप्रवर्तक नीलू मेहर, महिला व बालविकास प्रकल्प अंगणवाडी सुपरवायझर काळे, पंचशीला डांगे, आलेझरीचे सरपंच गौतम, कटरे, भोंडे, पाटील, हायस्कूलचे शिक्षक व कर्मचारी, सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका मीनाक्षी जांभूळकर, शोभा पटले, सुनीता कोठीकर, सुनंदा वासनिक, लक्ष्मी उके, शोभा परतेती, स्वाती बिसेन, छाया किरसान, मीना पटले, शांता रहांगडाले, सुनीता मेश्राम यांनी सहकार्य केले.
.......
विविध स्पर्धांचे आयोजन
सुकडी डाकराम अंगणवाडी बिटच्या वतीने एकदिवसीय पोषण महा अभियानच्या अंतर्गत रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, पथनाट्य, कलापथक, सामूहिक दहीकाला सारख्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
.....
मेळाव्यातून जनजागृती
या एकदिवसीय महिला मेळाव्याला कार्यक्रमाचे उद्घाटक उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी गणवीर यांनी पोषण अभियानाची लाभार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी. माता, बालक, गरोदरमाता, किशोरवयीन मुली, शून्य ते सहा वर्षांचे बालक यांच्यामध्ये कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे. गावागावात या अभियानाची माहिती व्हावी, सर्वांनी कुपोषण अभियानाला सहकार्य करावे असे उद्घाटनपर भाषणात गणवीर बोलत होते.
.......