लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : राष्ट्रीय महामार्ग क्रं.६ वरील देवरी नजीकच्या पुतळी फाट्याजवळ नागपूरकडून रायपूरकडे कागदाचा रोल घेवून जाणाºया धावत्या ट्रकला अचानक आग लागली. यात ट्रक देखील नुकसान झाले. ही घटना शनिवारी (दि.२१) रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार शनिवार पहाटे ५ वाजताच्या सुमारास नागपूरकडून रायपूरकडे कागदाचा रोल भरुन घेवून जाणारा ट्रक क्रमांक सी. जी. ०४/सीएस-५०३७ ला अचानक आग लागली. ट्रक चालकाने पुतळी फाट्याजवळ खुली जागा पाहून आपले वाहन रोडाच्या बाजूला उभे केले.तसेच ट्रक लागलेली आग विझविण्यासाठी परिसरातील नागरिकांना मदत मागितली. मात्र महामार्गावर अग्नीश्मन वाहन किंवा पाणी वेळीच उपलब्ध झाले नाही. परिणामी ट्रकमधील संपूर्ण कागदाचे रोल जळून खाक झाले. यात ट्रकचे आणि कागदाचे रोलचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलल्या जाते. ट्रक चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी घटना टळली. दरम्यान ट्रकमधील रोलला नेमकी आग कशामुळे लागली हे कळू शकले नाही. या घटनेची नोंद देवरी पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरु आहे.
देवरी हायवेवर ‘द बर्निंग ट्रक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 11:38 PM
राष्ट्रीय महामार्ग क्रं.६ वरील देवरी नजीकच्या पुतळी फाट्याजवळ नागपूरकडून रायपूरकडे कागदाचा रोल घेवून जाणाºया धावत्या ट्रकला अचानक आग लागली.
ठळक मुद्देट्रकमधील कागदाचे रोल जळाले : लाखो रुपयांचे नुकसान