शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव मिळावा व खासगी व्यापाऱ्यांकडून त्यांची पिळवणूक होऊ नये म्हणून शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्रांना वनपट्टेधारक शेतकऱ्यांची हमीभावाने धान खरेदी करण्यास मंजुरी नुकतीच दिली आहे. परंतु या परिसरातील बऱ्याच वनजमीन पट्टेधारक शेतकऱ्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या वारसानांनी या जमिनीतून खरीप हंगामातील पिकविलेले धान खरेदी करण्यास नकार देत असल्यामुळे ते अडचणीत आले आहे. मृतक शेतकऱ्यांची वारसान शेतीच्या भरवशावर आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांना दुसरे कोणतेही साधन नाही. अशा मृतक कुटुंबीयांच्या वारसानांनी वनहक्क पट्टेधारक जमिनीतून पिकविलेली कोणत्याही खासगी व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ येऊन त्यांची पिळवणूक होऊ नये यासाठी आदिवासी महामंडळाच्या आधारभूत धान खरेदी केंद्र, केशोरी, गोठणगाव, इळदा येथे हमीभावाने खरेदी करण्याची मंजुरी द्यावी, या आशयाचे निवेदन विनोद पाटील-गहाणे, योगेश नाकाडे यांनी परिसरातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या सह्यानिशी निवेदन जिल्हाधिकारी गोंदिया यांच्याकडे पाठविले आहे.
वनपट्टेधारक शेतकऱ्यांच्या वारसानांचे धान खरेदी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:30 AM