कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खरीप हंगामातील धानाची रेकॉर्ड ब्रेकींग १८.३६ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली. त्यानंतर आता मार्केटींग फेडरेशनने रब्बीतील धानाची सुध्दा बम्पर खरेदी केली आहे. फेडरेशनने जिल्ह्यातील ५३ केंद्रांवर आतापर्यंत ३ लाख ८७ हजार ८६९ क्विंटल धान खरेदी केली आहे.६७ कोटी ८७ लाख ७० हजार ७५० रूपयांची ही धान खरेदी असून १० हजार ४९२ शेतकऱ्यांनी आपले धान खरेदी केंद्रांवर विकले आहे.‘धानाचे कोठार’ अशी ख्याती असलेल्या जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हवामानातील बदलाचा फटका सहन करावा लागत आहे. परिणामी मागील दोन तीन वर्षांपासून पाहिजे त्या प्रमाणात धानाचे उत्पादन झाले नव्हते. मात्र यंदा सुरूवातीपासूनच पावसाने साथ दिल्याने धानाचे समाधानकारक पीक झाले. यामुळे यंदा धान उत्पादक समाधानी असून धानाचे कोठार पुन्हा एकदा भरून निघाले आहे. त्यामुळेच जिल्हा मार्के टींग फेडरेशनने खरीपाची कधी नव्हे एवढी सुमारे १८ लाख ३६ हजार क्विंटल धान खरेदी केली होती.त्या पाठोपाठ आता उन्हाळीच्या खरेदीतही मार्के टींग फेडरेशनने बाजी मारली आहे. फेडरेशनने आतापर्यंत ३ लाख ८७ हजार ८६९ क्विंटल धान खरेदी केली आहे. जिल्ह्यात फेडरेशनचे सध्या ५३ केंद्र सुरू असून या केंद्रांवर धान खरेदी सुरू आहे. आतापर्यंत १० हजार ४९२ शेतकºयांकडून ही खरेदी करण्यात आली असून ६७ कोटी ८७ लाख ७० हजार ७५० रूपयांची ही धान खरेदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी केवळ ५६ हजार क्विंटल रब्बीतील धान खरेदी करण्यात आली होती. त्यातुलनेत यंदा उन्हाळीच्या धान खरेदीतही रेकॉर्ड होणार असल्याचे दिसत आहे.धान खरेदीचे सर्व रेकार्ड मोडलेमार्केटींग फेडरेशनने यंदा सुमारे १८ लाख ३६ हजार क्ंिवटल धान खरीपात खरेदी केले होते. विशेष म्हणजे, जिल्हा निर्मितीच्या २० वर्षांच्या कालावधीत एवढी धान खरेदी कधीच झाली नव्हती. यावरून खरीपात रेकॉर्ड ब्रेक धान खरेदी झाली होती.पाच लाख क्विंटल धान खरेदीचा अंदाजखरीपाची रेकॉर्ड ब्रेक धान खरेदी झाल्यानंतर आता रब्बीची धान खरेदी ही बम्पर खरेदी ठरत आहे. मागील वर्षी ५६ हजार तीन क्विंटल उन्हाळी धानाची खरेदी झाली होती. तर यंदा आतापर्यंत ३ लाख ८७ हजार ८६९ क्विंटल धान खरेदी झाली असून मागील वर्षीच्या कितीतरी पट जास्त धान खरेदी झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, येत्या ३० तारखेपर्यंत धान खरेदी सुरू राहणार असून पाच लाख क्विंटल धान खरेदी होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
खरिपापाठोपाठ रब्बीतही रेकॉर्ड ब्रेक खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:04 PM
खरीप हंगामातील धानाची रेकॉर्ड ब्रेकींग १८.३६ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली. त्यानंतर आता मार्केटींग फेडरेशनने रब्बीतील धानाची सुध्दा बम्पर खरेदी केली आहे. फेडरेशनने जिल्ह्यातील ५३ केंद्रांवर आतापर्यंत ३ लाख ८७ हजार ८६९ क्विंटल धान खरेदी केली आहे.६७ कोटी ८७ लाख ७० हजार ७५० रूपयांची ही धान खरेदी असून १० हजार ४९२ शेतकऱ्यांनी आपले धान खरेदी केंद्रांवर विकले आहे.
ठळक मुद्दे३.८७ लाख क्विंटल खरेदी : १० हजार शेतकऱ्यांनी केली धानाची विक्री