गोंदिया : लगतच्या ग्राम खमारी येथील माहेश्वरी साँल्वंट प्लांटमध्ये कामावर असलेल्या कामगारांनी आपल्या थकीत वेतनासह इतर मागण्यांना घेऊन सोमवारपासून (दि. २१) आमरण उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे.
राष्ट्रीय केमिकल संघटनेचे संपत वाढई यांच्या नेतृत्वात विनोद पडोले यांच्या मार्गदर्शनात कामगारांनी उपोषण सुरू केले आहे. कामगारांना गेल्यावर्षी लागलेल्या लाॅकडाऊनमध्ये बंद करण्यात आले, तेव्हापासून त्यांना वेतन देण्यात आले नाही. तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कम सुद्धा भरण्यात न आल्याने हे आंदोलन सुरु करण्यात आल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. जवळपास ५० कामगारांचे थकीत वेतन मिळावे व भविष्य निर्वाह निधीसह सर्व हिशोब मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा धनंजय शिवणकर, धनराज भांडारकर, होलूराम सव्वालाखे, ओमेश कटरे, मुलचंद तुरकर, घनश्याम तिडके, लिखीराम मुनीश्वर, महेंद्र बडोले, संतोष बारापात्रे, अमर बारापात्रे, रंगलाल बोपचे, श्रावण टेंभरे, सुनील बारापात्रे, नरेंद्र उके, नेवालाल काटेवार, अनिल ढोमणे, रामदास येरणे, महेंद्र येरणे, नरेंद्र येरणे, चनीराम बोपचे, चंदन बिसेन, ईश्वर तुरकर, राकेश मेश्राम, रमेश तवाडे, गोपाल भांडारकर, रवींद्र चुटे, कमलेश मानकर आदींनी दिला आहे.