लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कुठल्याही संकटात असलेल्या व्यक्तीच्या मदतीला धावून जाण्यासाठी महाराष्ट्र पोलिस दलातर्फे ११२ डायल सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा क्रमांक डायल करताच अगदी १० मिनिटांच्या आत पोलिसांची ११२ क्रमांकाची व्हॅन त्या व्यक्तीच्या समोर मदतीसाठी उभी राहते.
जानेवारी ते मे या पाच महिन्यांत ११२ क्रमांकावर एकूण तीन हजार ८७४ विविध तक्रारी दाखल झाल्या आहेत. यात महिलांविषयक सर्वाधिक तक्रारी आहेत. या सेवेमुळे कुटुंबातील वाद, घरफोड्या थोपविण्यास मदत झाली आहे. सामान्य नागरिकांसाठी पोलिस दलाची ११२ ही डायल सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अगदी घरगुती वादापासून, ज्येष्ठांच्या समस्या, अडचणी पोलिसांकडून सोडविल्या गेल्या आहेत. एवढेच नव्हे, तर मुली, महिलांवरील अत्याचार, छेडछाड, आत्महत्या आणि अगदी चोऱ्याही थोपविण्यासाठी या सेवेचा उपयोग नागरिकांना झाला आहे.
सामान्य नागरिकांना तातडीने मिळावी, या उद्देशाने पोलिस दलाची ११२ क्रमांकाची ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नंबर डायल करताच तत्काळ मदत मिळते. जिल्ह्यात ११२ डायल सेवेकडे आलेल्या तक्रारींमध्ये अपघात, घरगुती वाद, ज्येष्ठांच्या समस्या तसेच छेडछाड, महिलांच्या समस्या यांची संख्या अधिक आहे. त्याचप्रमाणे ११२ वर मदतीसाठीही कॉल येत असतात.
या हेल्पलाइनवरही मागा मदतइमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टमअं- तर्गत ११२ डायल सेवा उपलब्ध आहे, तसेच १०० या टोल फ्री नंबरवर पोलिसांची मदत मागता येते.
कारवाईमुळे यंदा बोगस कॉल नाही१) ११२ क्रमांक डायल करताच अगदी १० मिनिटांच्या आतच पोलिस दलाची ११२ क्रमांकाची व्हॅन नमूद करण्यात आलेल्या ठिकाणी मदतीसाठी पोहोचते. त्यामुळे काही वेळा त्रास देण्याच्या हेतूने काही समाजकंटक या सेवेचा दुरुपयोग करतात.२) या क्रमांकावर कॉल करून खोटी तक्रार किंवा मदत मागतात. मात्र, हे निदर्शनात आल्यास अशांवर कारवाईही करण्यात येते.३) मागील वर्षी अर्जुनी-मोरगाव येथील एका महिलेने बोगस तक्रार डायल ११२ वर केली असता, तिला शिक्षा झाल्याने गोंदियात बोगस कॉल येणे बंदच झाले आहे.
कॉल येताच पोलिस होतात रवाना"११२ हा क्रमांक डायल केल्यानंतर तो नियंत्रण कक्षात जातो. तो कॉल ज्या पोलिस ठाण्याच्या अखत्यारीत असेल त्या पोलिस ठाण्याकडे तक्रार कळविली जाते. अगदी १० मिनिटांत ११२ क्रमांकाची व्हॅन तक्रारदारापर्यंत पोहोचते. गेल्या पाच महिन्यांत विविध तक्रारी तसेच मदतीसाठी जिल्ह्यातून तीन हजार ८७४ कॉल ११२ या क्रमांकावर आले आहेत."- निखिल पिंगळे, पोलिस अधीक्षक, गोंदिया.