लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी (दि.६) जि.प.च्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सभेला सुरूवात होवून काही विषयांवर चर्चा सुरु असतानाच अध्यक्षांच्या मोबाईलवर एक कॉल आला. त्यानंतर काही क्षणातच अध्यक्षांनी ही सभा तहकुब करण्यात येत असून हीच सभा दोन दिवसात घेण्यात येईल असे सांगत सभागृह सोडले. त्यामुळे सभागृहात उपस्थित सर्व सदस्य अवाक झाले. जि.प.च्या आजवरच्या इतिहासात असा प्रकार प्रथमच घडला. त्यामुळे तो कॉल नेमका कुणाचा याचीच सध्या जि.प.च्या वर्तुळात चर्चा सुरू आहे.स्थायी समितीच्या सभेला शुक्रवारी दुपारी १ वाजता जि.प.अध्यक्षा सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. सभापती रमेश अंबुले, लता दोनोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दयानिधी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावळे, समिती सदस्य गंगाधर परशुरामकर, सुरेश हर्षे, राजलक्ष्मी तुरकर, पी.जी. कटरे, उषा शहारे व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. सभेला सुरुवात होताच जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी औचित्याचा मुद्दा म्हणून पंचायत समितीने सरपंचाला संमेलनाला बोलाविले पण त्यांच्या बसण्याची व्यवस्था केली नाही. त्यामुळे खंडविकास अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी केली. त्यावर समिती सदस्य सुरेश हर्षे, राजलक्ष्मी तुरकर, पी.जी. कटरे, उषा शहारे सर्वांनीच याचा निषेध करुन खंडविकास अधिकाºयाला खडे बोल सुनावले. यावर खंडविकास अधिकारी आनंद लोकरे यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावर सभागृहाचे समाधान झाले नाही.खंडविकास अधिकाºयाने दिलगिरी व्यक्त करण्यास नकार देताच अध्यक्ष सीमा मडावी व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दयानिधी यांनी तातडीने कारवाई करण्याचे सभागृहाला आश्वासन दिले.त्यानंतर सुरेश हर्षे यांनी पाणी टंचाईवर चर्चा सुरू केली. त्यातही सर्व सदस्यांनी चर्चेत भाग घेतला. या विषयावरील चर्चेत परशुरामकर यांनी भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पाण्याच्या पातळीचे सर्वेक्षण केले. तो अहवाल सभागृहासमोर ठेवून झपाट्याने पाण्याची पातळी खालावत असल्याचे निदर्शनास आणून दिले. संपूर्ण जिल्ह्यात पाणी टंचाई असताना जिल्ह्यातील केवळ ३३२ गावे व ५६ वाड्यांमध्ये पाणी टंचाई असल्याचे दाखविण्यात आले.त्यावरील उपाययोजनेसाठी केवळ १ कोटी २६ लाख रुपये उपलब्ध करुन दिल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दयानिधी यांनी आता ७०० अधिक गावांचा समावेश करण्यात आला असल्याचे सांगितले. यांत्रीकी विभागाच्या वतीने ७००० पाईप उपलब्ध झाल्याचे सांगितले. त्याचे समन्वयाने वाटप करावे, अशी मागणी सुरेश हर्षे, परशुरामकर, पी.जी. कटरे, राजलक्ष्मी तुरकर, उषा शहारे यांनी केली.मागील सभेत सडक अर्जुनी पंचायत समितीतील सिमेंट रस्ते, रखडलेली घरकुलाची कामे, मंजुरी न घेता केलेली खरेदी या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली नसल्याची बाब परशुरामकर यांनी निदर्शनास आणून दिली. यावर अध्यक्षांनी खंडविकास अधिकारी आनंद लोकरे यांना उत्तर देण्यासाठी पाचारण केले. तेव्हा आनंद लोकुरे यांनी चक्क उत्तर देण्यासाठी समोर न येता सभागृहातून काढता पाय घेतला. त्यामुळे या प्रकाराने सारेच अवाक झाले. दरम्यान यासर्व विषयांवर चर्चा सुरु असतानाच अध्यक्ष सीमा मडावी यांच्या भ्रमणध्वनीवर एक कॉल आला व सभेचे उर्वरित कामकाज थांबवित त्या सभागृहातून निघून गेल्या. वास्तविक त्यांच्याच पक्षाचे सभापती रमेश अंबुले व लता दोनोडे सभागृहात असताना त्यांना उर्वरित सभेची कारवाई सांभाळण्याचे आदेश देणे गरजेचे होते. मात्र असे काहीच केले नाही. त्यामुळे तो कॉल कुणाचा याचीच सभागृहात चर्चा रंगली.
मोबाईलवर कॉल येताच सभा केली तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 12:17 AM
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी (दि.६) जि.प.च्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सभेला सुरूवात होवून काही विषयांवर चर्चा सुरु असतानाच अध्यक्षांच्या मोबाईलवर एक कॉल आला.
ठळक मुद्देजिल्हा परिषद स्थायी समितीची सभा : महत्त्वाचे मुद्दे बाजूला