शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

पोलिस दलात नोकरीचे नियुक्तिपत्र घेऊन आला अन् अडकला

By नरेश रहिले | Published: August 25, 2024 6:40 PM

डुग्गीपार पोलिसांची कारवाई : फसवणुकीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

गोंदिया : नोकरीचे आमिष देऊन कित्येकांना गंडा घालण्यात येत असल्याचे प्रकार घडत आहेत. असे असतानाच औरंगाबाद पोलिस दलात शिपाई पदावर नोकरी लावून देण्याकरिता उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना नियुक्तिपत्र देण्यासाठी आलेल्या तोतया पोलिसाला डुग्गीपार पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.२३) ग्राम खोडशिवनी येथील रेल्वे स्थानक परिसरात करण्यात आली आहे. विलास नारायण गणवीर (६५, रा. किन्ही-मोखे, ता. साकोली, जि. भंडारा) असे आरोपीचे नाव आहे.

शुक्रवारी डुग्गीपार येथील पोलिस हवालदार दीपक खोटेले यांना ग्राम खोडशिवनी रेल्वे स्थानक परिसरात एक व्यक्ती औरंगाबाद पोलिस दलात शिपाई या पदावर नोकरी लावून देण्याकरिता उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना नियुक्तिपत्र देणार आहे, अशी खात्रीशिर माहिती मिळाली. ही बाब त्यांनी वरिष्ठांना कळविली व वरिष्ठांच्या निर्देशानुसार फिर्यादी वामन व्यंकटराव भुरे (रा. पालेवाडा) यांच्या मदतीने पोलिस निरीक्षक मंगेश काळे यांच्या नेतृत्वातील पथकाने ग्राम खोडशिवनी येथील रेल्वे स्थानक गाठून परिसरात सापळा लावला. याप्रसंगी त्यांनी आरोपी विलास गणवीर याला ताब्यात घेऊन जेरबंद केले. त्याच्यावर डुग्गीपार पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम २०४, २०५, ३१९(२), ३१८(४), ६२, ३३६(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक काळे, सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद बांबोळे, पोलिस हवालदार दीपक खोटेले, घनश्याम उईके, पोलिस नायक महेंद्र चौधरी, घनश्याम मुळे यांनी केली आहे.

बॅगमध्ये आढळून आले हे साहित्य- आरोपी विलास गणवीर याची चौकशी करून त्याच्याकडे असलेल्या बॅगची तपासणी केली असता बॅगमध्ये पोलिस अधिकाऱ्यांची वर्दी, बनावट नेमप्लेट, पोलिस अधिकाऱ्याचे बनावट ओळखपत्र, औरंगाबाद पोलिस भरती उमेदवार प्रवेशपत्र, औरंगाबाद येथील मुख्य वैद्यकीय अधिकारी व पोलिस अधीक्षक यांचा शिक्का असलेले कागदपत्र, विद्यार्थ्यांचे मूळ टिसी, मार्कशिट, डोमेसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, जात वैधता प्रमाणपत्र आदी मिळून आले.

फसवणुकीचे ८ ते १० गुन्हे दाखल- आरोपी विलास गणवीर याच्यावर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत ८ ते १० गुन्हे दाखल आहेत.

२८ पर्यंत पीसीआर- आरोपी विलास गणवीर याला सडक-अर्जुनी येथील प्रथमश्रेणी न्यायालयात हजर केल्यावर त्याला न्यायालयाने बुधवारपर्यंत (दि.२८) पोलिस कोठडी सुनावली आहे.

भूलथापांना बळी पडू नका- नोकरी लावून देण्याच्या नावावर फसवणूक संबंधात अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन पैसे घेऊन भूलथापा देण्याऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नये. लाच देणे व घेणे हा गुन्हा आहे. नोकरी लावून देण्याकरिता कुणी पैशांची मागणी केल्यास वा पैशांची मागणी करणाऱ्या विरुद्ध तक्रार प्राप्त झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. भूलथापांना बळी पडू नका.- गोरख भामरे, पोलिस अधीक्षक गोंदिया.

टॅग्स :gondiya-acगोंदियाfraudधोकेबाजी