लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकार आॅनलाईन औषध विक्रीला परवानगी देण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी मसुदा तयार केला जात आहे. त्यामुळे देशभरातील केमिस्ट संघटनांनी याचा विरोध केला आहे. आॅनलाईन औषध विक्रीचा विरोध करण्यासाठी मंगळवारी (दि.८) जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला.आॅनलाईन औषधीसाठी केंद्र सरकार अनुमानित प्रस्तावित मसुदा तयार करीत आहे. या विरोधात अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने अनेकदा आंदोलने केली. मात्र याचा कुठलाच परिणाम सरकारवर झाला नाही. चेन्नई व दिल्ली उच्च न्यायालयाने आॅनलाईन औषध विक्री बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र सरकार यानंतरही याचा विरोध करीत आहे. सरकारने मसुदा तयार करताना संघटनेचे मत जाणून घेण्याची गरज आहे.आॅनलाईन औषध विक्रीमुळे होणारे परिणाम व नुकसानाची माहिती सरकारला देण्यात आली. मात्र यानंतरही शासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या प्रस्तावित अधिसूचनेचा मसुदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी भारतभर औषध विक्रेत्यांकडून मंगळवारी (दि.८) हल्लाबोल व मुक मोर्चाचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार, येथील जिल्हा औषध विके्रता संघाच्यावतीने मंगळवारी (दि.८) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल करून मूक मोर्चा काढण्यात आला. तसेच मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक यांना देण्यात आले.याप्रसंगी संघाचे अध्यक्ष उत्पल शर्मा, उपाध्यक्ष राजेश अग्रवाल, रूपेश रहांगडाले, ललीत सोनछात्रा, रूपेश तिवारी, सुसेनजीत शहा, ललीत बघेले, मनोज पटनायक, मनोज नायकने, निलकंठ लांजेवार, नरेंद्र बहेटवार, चैतराम शेंडे, छगन कापगते यांच्यासह संघाचे माजी अध्यक्ष, जिल्ह्यातील पदाधिकारी असे सुमारे २५० सदस्य उपस्थित होते.
आॅनलाईन औषध विक्रीचा मसूदा रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 1:06 AM
केंद्र सरकार आॅनलाईन औषध विक्रीला परवानगी देण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी मसुदा तयार केला जात आहे. त्यामुळे देशभरातील केमिस्ट संघटनांनी याचा विरोध केला आहे. आॅनलाईन औषध विक्रीचा विरोध करण्यासाठी मंगळवारी (दि.८) जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला.
ठळक मुद्देऔषध विके्रता संघ : जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा