अटी-शर्तींकडे दुर्लक्ष : नवीन गट प्रवर्तक पदभरतीलोकमत न्यूज नेटवर्ककाचेवानी : तिरोडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडीकोटा, वडेगाव व सुकडी येथे नवीन गट प्रवर्तकांचे पद भरण्यासाठी मान्यता देण्यात आली. पदभरतीसाठी आवेदन मागविण्यात आले. मात्र पात्र-अपात्रची छानणी करताना अटी शर्तींकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे ही प्रक्रिया थांबवून अन्याय दूर करावा, अशा मागणीचे पत्र वरिष्ठांना देण्यात आले आहे.सदर तिन्ही आरोग्य केंद्रांतर्गत आशा सेविकांमधून आशा सेविका सुपरवायझर पदाच्या निवडीसाठी २१ एप्रिल २०१७ रोजी तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय तिरोडा येथे यादी प्रकाशित करण्यात आली. त्यात सहा अटीशर्ती दिल्या होत्या. यात अर्जदार महिला असावी, आशा स्वयंसेविका म्हणून कार्यरत असावी, अर्जदार संबंधित आरोग्य केंद्रात कार्यरत असावी, वयोमर्यादा २१ ते ४० वर्षे असावी, एमएससीआयटी उत्तीर्ण असावी व शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असावी, अशा आहेत. यात उच्च शिक्षितांना प्राधान्य आहे.आता दोन महिन्यांनंतर २० जून रोजी दुपारी अचानक अर्जांी छाणनी करून पात्र-अपात्र यादी प्रकाशित करण्यात आली. यात अनेक पात्र नावे अपात्र ठरविण्यात आले. तर जे अपात्र आहेत त्यांना पात्र ठरविण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे आक्षेत नोंदविण्याची तारिख एक दिवसाची म्हणजे २१ जून २०१७ देण्यात आली आहे. अपात्र ठरविण्यात आलेल्या आशा सेविका पौर्णिमा बन्सोड (वडेगाव), उमन भेलावे (घाटकुरोडा), भुमेश्वरी गौतम (बोरा), ममता पेशने (मनोरा), शोभा रहांगडाले (चिरेखनी), हिवनकला पारधी (चिरेखनी), मिनाक्षी पाटील (उमरी) यांनी तिरोड्याचे आरोग्य अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती व आरोग्य मंत्री, मुंबई यांना पत्र पाठवून ही प्रक्रिया थांबवून अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे.
पात्र अपात्र यादी रद्द करा
By admin | Published: June 23, 2017 1:10 AM