शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

वनहक्क कायद्याचे नवीन परिपत्रक रद्द करा!

By admin | Published: August 05, 2016 1:40 AM

महाराष्ट्र शासनाने १८ जून २०१५ रोजी व्हीलेज फॉरेस्ट रुल्स संदर्भातले एक परिपत्रक जारी केले आहे.

आंदोलनाचा इशारा : सहषराम कोरोटे यांच्या नेतृत्वात निवेदन देवरी : महाराष्ट्र शासनाने १८ जून २०१५ रोजी व्हीलेज फॉरेस्ट रुल्स संदर्भातले एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात वनखात्याला सामूहिक वनहक्क काढून घेता येऊ शकते. अशी नवीन अट या परिपत्रकात समाविष्ट करण्यात आली आहे. या नवीन अटीसह जारी करण्यात आलेले वनहक्क कायद्याच्या संदर्भातले परिपत्रक महाराष्ट्र शासनाने त्वरित रद्द करावे या आशयाचे एक निवेदन बुधवारी (दि.३) गोंदिया जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री यांच्या नावे देवरीचे उपविभागीय अधिकारी यांचे प्रतिनिधी तहसीलदार संजय नागतिळक यांच्या मार्फत काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, आता सुरू असलेल्या केंद्रातील पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत कॅम्पा विधेयकावर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी वनीकरण व्यवस्थापन आणि नियोजन प्राधीकरण संदर्भात बोलताना म्हटले आहे. त्यानुसार महाराष्ट्राच्या आघाडी सरकारने २००६ साली वनहक्क कायदा मंजूर केला. त्यानुसार वैयक्तीक व सामूहिकरित्या वनहक्क आघाडी शासनाकडून देण्यात आले होते. यात त्या वनाची निगरानी त्या परिसरातील लोकांनी करायची आणि त्या बदल्यात वनापासून मिळणारे उत्पन्न ही त्यांनीच वापरायचा अशा प्रकारचा चांगला उपक्रम आघाडी सरकारने सुरू केला आहे. परंतु महाराष्ट्र शासनाने १८ जून २०१५ रोजी व्हीलेज फारेस्ट रुल्स संदर्भातले एक परिपत्रक जारी केला आहे. या परिपत्रकानुसार वनखात्याला सामूहिक वनहक्क काढून घेता येऊ शकते. यात एक नवीन अट समाविष्ठ करण्यात आली आहे. या अटीमुळे गोंदिया जिल्ह्यातील देवरी, सालेकसा व मोरगाव अर्जुनी तालुक्यातील जंगल व्याप्त गावातील ग्रामसभेच्या अधिकारावर अतिक्रमण होऊन येथील राहणाऱ्या आदिवासी लोकांवर फार मोठ्या प्रमाणावर अन्याय होणार आहे. असा निवेदनात म्हटले आहे. आपल्या शासनाद्वारे जारी केलेले १८ जून २०१५ चे व्हिलेज फॉरेस्ट रुल्स संदर्भातले परिपत्रक त्वरित रद्द करुन आघाडी सरकारने पूर्वी तयार केलेले परिपत्रक जसेच्या तसे ठेवावे अशी मागणी करणारे एक निवेदन गोंदिया जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहेषराम कोरोटे यांच्या नेतृत्वात बुधवारी (दि.३) काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री यांच्या नावे देवरीचे उपविभागीय अधिकारी यांचे प्रतिनिधी तहसीलदार संजय नागतिलक यांच्या मार्फत सादर करण्यात आले. या निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात जिल्हा महासचिव सहषराम कोरोटे, गोंदिया जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा उषा शहारे, तालुका काँग्रेस अध्यक्ष राधेशाम बगडीया, जि.प. सदस्या माधुरी कुंभरे, जि.प. सदस्य दिपकसिंग पवार, देवरी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, देवरी पं.स.चे उपसभापती संगीता भेलावे, पं.स. सदस्य लखनी सलामे, उपाध्यक्ष चैनसिंग मडावी, माजी जि.प. सदस्य संदीप भाटीया, वरिष्ठ कार्यकर्ता बळीराम कोटवार, शिलापूरचे माजी सरपंच धनपत भोयर, कैलास घासले, कला सरोटे, राम गोपाले, सरपंच भोजराज घासले, सावंत राऊत, सुरेंद्र बन्सोड, टी.डी. वाघमारे, तारण राऊत, सरपंच नूतन बन्सोड, ओमराज बहेकार, सरपंच गजरु नेताम, महागू मडावी, किसन कोरे, सरपंच नुरचंद नाईक, बुधराम ओटी, घनशाम फरकुंडे, माजी पं.स. सदस्य सोनू नेताम, मिसपिरीचे उपसरपंच जीवन सलामे, मानिकचंद आचले, चिंतामणी गंगाबोईर आणि राजू राऊत यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता. या निवेदनात सदर मागणी संदर्भात जर योग्य निर्णय त्वरित घेण्यात आले नाही तर या मागणीला धरुन काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल असा इशारा ही दिला आहे. (प्रतिनिधी)