शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

काय सांगता! ३०६ मते घेणारा उमेदवार पराभूत, अन् २८७ मते घेणारा विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 3:02 PM

निवडणूक विभागाचा अजब कारभार : दत्तोरा येथील वॉर्ड क्रमांक २ वांध्यात

गोंदिया : तालुक्यातील दत्तोरा येथील ग्रामपंचायतच्या वॉर्ड क्रमांक दोन येथील अधिक मते घेणाऱ्या उमेदवारांना पराभूत तर कमी मते घेणाऱ्या उमेदवाराला विजयी झाल्याचे प्रमाणपत्र गोंदियानिवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले. यामुळे नेमका कोण विजयी हा पेच पुढे असून यासंदर्भात पुन्हा मतमोजणी करावी व निकाल द्यावा, अशी मागणी दोन उमेदवारांनी केली आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दत्तोराच्या वॉर्ड क्रमांक २ येथे जोडपत्र १५ मध्ये हेमने विनोद सदाशिव यांना ३०६ मते, तर त्यांच्या विरोधात असलेल्या उमेदवाराला २८७ मते मिळाली आहेत, तसेच सुरेखा कोरे यांना ३०५ मते मिळालेली असून त्यांच्या विरोधातील उमेदवाराला २८६ मते मिळाली आहेत. कमी मते घेणाऱ्याला विजयी आणि जास्त मते घेणाऱ्याला पराभूत झाल्याचा गोंधळ निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.एन. इलमकर आणि सह निवडणूक अधिकारी लिल्हारे यांनी केला आहे. यामुळे दत्तोरा येथील लोकांत संभ्रम निर्माण झाला असून, उपसरपंचाची निवडणूक स्थगित करण्यासंदर्भात तालुका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी २ जानेवारी रोजी पत्र दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या माहितीतदेखील विनोद हेमने व सुरेखा कोरे हे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पाठविले आहे; परंतु त्यांना विजयी झाल्याचे प्रमाणापत्र निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणारे व्ही.एन. इलमकर यांनी दिले नाही.

पुन्हा मतमोजणी करा

दत्तोरा येथील वॉर्ड क्रमांक दोन येथील मतमोजणी पुन्हा करून आम्हाला न्याय देण्यात यावा, अन्यथा विजयाचे प्रमाणपत्र देण्यात यावे. तोपर्यंत उपसरपंचाची निवडणूक घेऊ नये, असा पवित्रा दत्तोरा येथील लोकांनी घेतला आहे.

अहवालाच्या आधारे होईल कारवाई

मतमोजणीत जे विजयी झाले त्यांनाच विजयाचे प्रमाणपत्र देण्यात आले. चुकीने पराभूत झालेल्यांची नावे विजयाच्या यादीत आल्याचे इलमकर यांनी सांगितल्याचे तहसीलदार संतोष खांडरे यांनी सांगितले. आलेल्या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येईल, असेही खांडरे यांनी सांगितले.

सुटीच्या दिवशी विजयाचे प्रमाणपत्र कसे दिलेे

१८ डिसेंबर रोजी निवडणूक झाली. त्याचवेळी विजयी झाल्याचे प्रमाणपत्र विजयी उमेदवारांना द्यायला पाहिजे होते; परंतु त्या दिवशी विजयाचे प्रमाणपत्र न देता सुटीच्या दिवशी विजयाचे प्रमाणपत्र १ जानेवारीला देण्यामागील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे हित काय, असा सवाल विनोद हेमने व सुरेखा कोरे यांनी केला आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगgondiya-acगोंदिया