लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्वच इच्छुक उमेदवार मतदारसंघात सक्रीय झाले आहेत. जेवणावळी आणि पार्ट्यांचे आयोजन करुन आत्तापासूनच आपल्या समर्थकांना खूश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची यादी बरीच लांब लचक असल्याने रंगत वाढल्याचे चित्र अर्जुनी मोरगाव मतदारसंघात आहे.संपूर्ण राज्यात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. गेल्या ६ महिन्यांपासून इच्छुकांनी उमेदवारीला घेऊन आपले दावे प्रतिदावे पक्षाकडे सादर केले.आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचाराला सुरुवातही केली. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्रयोग सुरु केले. आपणच उमेदवार आहोत, असा भास निर्माण करुन सभांचा धडाका सुरु केला आहे. उमेदवारांची भाऊ गर्दी वाढल्याने मतदार सुध्दा संभ्रमात आहे. अधिकृत उमेदवार कोण होणार याची सुध्दा उत्सुकता मतदारांमध्ये आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जास्तीत जास्त मतदान व्हावे,याकरिता निवडणूक विभागाने सुद्धा जय्यत तयारी केली आहे.अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात २ लाख ५२ हजार ५६८ मतदार आहे. मात्र या वेळी ६ हजार ९४८ मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक विभागाने आॅगस्ट अखेरपर्यंत घेतलेल्या मतदार नोंदणीमध्ये मतदारांनी नोंदणी केली आहे.विशेष म्हणजे निवडणूक विभागाने मतदार नोंदणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती. वरील वयोगटातील मतदार प्रथमच मतदान करणार आहेत. विभागाच्या माहितीनुसार नवमतदारांची मतदान करण्याची टक्केवारीही ९५ टक्यांच्यावर असते, त्यामुळे हे नवमतदार आता आपले मत कुणाच्या पारड्यात टाकणार याकडे लक्ष लागले आहे. या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याकडे सर्वच पक्षाच्या उमेदवारांचा कल असणार आहे.११४ शतकवीर करणार मतदानभारतीय लोकशाहीमध्ये १८ वर्षानंतर सर्वांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अर्जुनी मोरगाव मतदारसंघात वयाची शंभरी पार केलेले ११४ मतदार आहेत. या मतदारांची देशाच्या पहिल्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावल्याचे सांगितले जाते.
उमेदवारांच्या भाऊगर्दीने वाढली रंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 6:00 AM
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्वच इच्छुक उमेदवार मतदारसंघात सक्रीय झाले आहेत. जेवणावळी आणि पार्ट्यांचे आयोजन करुन आत्तापासूनच आपल्या समर्थकांना खूश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची यादी बरीच लांब लचक असल्याने रंगत वाढल्याचे चित्र अर्जुनी मोरगाव मतदारसंघात आहे.
ठळक मुद्देसर्वाधिक मतदार ४० ते ४९ वयोगटातील : ६९४८ नवमतदार करणार प्रथमच मतदान