ऑनलाईन लोकमतगोंदिया : रेल्वे स्थानकावर केरकचरा टाकणाऱ्या दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र यानंतरही बरेच प्रवाशी याकडे दुर्लक्ष करतात. मात्र हे दुर्लक्ष करणे १३५ प्रवाशांना भोवले असून त्यांना रेल्वे विभागाच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. रेल्वे स्थानकावर कचरा केल्याप्रकरणी १३५ जणावर कारवाई करुन त्यांच्याकडून १२ हजार ९५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे प्रवाशांचे धाबे दणाणले आहे.रेल्वे स्थानक परिसर नीट नेटका ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. मात्र यानंतरही बरेच प्रवाशी रेल्वे स्थानकावर केरकचरा टाकतात. अशा प्रवाशांवर नजर ठेवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई कारवाई केली जात आहे. याच अंतर्गंत दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मंडळातंर्गत दहा दिवस मोहीम राबवून ही कारवाई करण्यात आली.दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळातून धावणाºया प्रवासी गाड्या व मुख्य स्थानकांमध्ये १९ ते २० फेब्रुवारीपर्यंत विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. या १० दिवसांच्या अभियानात एकूण ८०६० प्रकणांची नोंद करून २०.६६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.दपूम रेल्वे नागपूर मंडळाद्वारे वरिष्ठ मंडल वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिबल यांच्या नेतृत्वात, वाणिज्य विभागाच्या अधिकाºयांच्या पुढाकारात, तिकीट निरीक्षक, वाणिज्य निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या सहकार्याने मंडळाच्या विविध लोहमार्गावरून धावणाºया एकूण ३३२ प्रवाशी गाड्या व मुख्य स्थानकांमध्ये विविध विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले.या अंतर्गत विनातिकीट/अनियमित प्रवास तसेच माल बुक न करता लगेज नेण्याचे ८०६० प्रकरणे नोंद करण्यात आले. त्यांच्याकडून एकूण २० लाख ६६ हजार १७० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.सहायक मंडळ वाणिज्य व्यवस्थापक ओ.पी. जायस्वाल यांनी तिकीट निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या सहकार्याने २४ फेब्रुवारीला भंडारा रोड स्थानकात किलेबंदी चेकींग केली. येथून ये-जा करणाºया २८ प्रवासी गाड्यांमध्ये विनातिकीट/अनियमित प्रवास तसेच माल बुक न करताच लगेज नेण्याचे ८२५ प्रकरणे एकाच दिवसात नोंदविण्यात आले. त्यांच्याकडून दंडस्वरूपात एक लाख ६९ हजार ७२५ रूपयांची वसूल करण्यात आला. १० दिवसांच्या विशेष तपासणी अभियानात ही वसुली सर्वाधिक ठरली.रेल्वे प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची असुविधा होवू नये यासाठी योग्य तिकीट घेवूनच प्रवास करावा, असे आवाहन दपूम रेल्वे नागपूरचे मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांनी केले आहे.
रेल्वेस्थानकावर केरकचरा टाकणे १३५ जणांना भोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 12:38 AM
रेल्वे स्थानकावर केरकचरा टाकणाऱ्या दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र यानंतरही बरेच प्रवाशी याकडे दुर्लक्ष करतात.
ठळक मुद्दे१० दिवसांत २० लाखांचा दंड वसूल : विशेष तिकीट तपासणी अभियान