शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
"१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
5
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
6
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
7
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
8
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
9
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
10
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
11
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
12
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
13
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
14
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
15
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
16
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
17
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
18
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
19
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
20
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...

काेरोनाने विषाणूने पकडली जिल्ह्यातून परतीची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 5:00 AM

मागील आठ दिवसांपासून शहरी भागासह ग्रामीण भागातील रुग्णसंख्यासुद्धा आटोक्यात आली आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड रुग्णालयातील बेडसुद्धा रिकामे झाले आहेत. तर आरोग्य यंत्रणेवरील ताणसुद्धा कमी झाला आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने १ लाख ५९ हजार ४४१ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १ लाख ३४ हजार ५३२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे.

ठळक मुद्दे१२१ बाधितांची मात : ४८ रुग्णांची नोंद : एका बाधिताचा मृत्यू

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया  : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असल्याने आता जिल्ह्यातून कोरोनाने परतीची वाट पकडल्याचे समाधानकारक चित्र आहे. रुग्णसंख्या जरी आटोक्यात येत असली तरी नागरिकांनी बिनधास्त न राहता पूर्वीइतकी काळजी घेणे गरजेचे आहे. गुरुवारी (दि.२७) जिल्ह्यात १२१ बाधितांनी कोरोनावर मात केली, तर ४८ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ५६० वर पोहोचली आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अशीच कायम राहिल्यास जिल्हा कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही. मागील आठ दिवसांपासून शहरी भागासह ग्रामीण भागातील रुग्णसंख्यासुद्धा आटोक्यात आली आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड रुग्णालयातील बेडसुद्धा रिकामे झाले आहेत. तर आरोग्य यंत्रणेवरील ताणसुद्धा कमी झाला आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने १ लाख ५९ हजार ४४१ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १ लाख ३४ हजार ५३२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यांतर्गत १५४७९० नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १३३३७३ नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत ४०५०४ कोरोनाबाधित आढळले. तर आतापर्यंत ३९२६३ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ५६० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून १९४ स्वॅब नमुन्याचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.  

संसर्ग आटोक्यात, पण दुर्लक्ष नकोच nरजिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असून रुग्णसंख्येला बऱ्याच प्रमाणात ब्रेक लागला आहे. दुसरी लोट आता पूर्णपणे ओसरायला लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी बिनधास्त न होता पूर्वीइतकी काळजी घेण्याची गरज आहे. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.

२५२० चाचण्या ४८ पॉझिटिव्ह-कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने १९२२ आरटीपीसीआर तर ५९८ रॅपिट अँटिजन अशा एकूण २५२० टेस्ट करण्यात आल्या. त्यात ४८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. रुग्णाचा पाॅझिटिव्हिटी रेट १.९० टक्के आहे. यावरून कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे.  

२ लाख ३४ हजार नागरिकांचे लसीकरण - कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात सध्या १४० केंद्रावरून लसीकरण मोहीम सुरू आहे. यांतर्गत आतापर्यंत २ लाख ३४ हजार ५९९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या