लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कास्ट्राईब महासंघाने कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलबिंत मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. बलकवडे यांनी महासंघाच्या मागण्यां व समस्या ऐकूण घेत त्या लवकरच निकाली काढण्याचे आश्वासन दिले.महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण संघ जिल्हा शाखेची सभा नुकतीच जिल्हाधिकारी बलकवडे यांच्या कक्षात पार पडली. सभेला निवासी उपजिल्हाधिकारी धार्मिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके, भूमि अभिलेख व एस.टी.महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध विभागात रिक्त असलेल्या पदांची माहिती मागविली. तेव्हा २४ विभागांची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली तर उर्वरित विभागाची माहिती लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना कालबध्द, आश्वासीत प्रगती योजनेचा लाभ त्वरीत देण्यात यावा, कर्मचाºयांच्या वेतनातील त्रृटी दूर करण्यात याव्या. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयानुसार समान काम समान वेतन देण्यात यावे, यासह इतर मागण्यांवर चर्चा करण्यात आली. या वेळी संघटनेचे उपमहासचिव सूर्यभान हुमणे, जिल्हाध्यक्ष विनोद बन्सोड, विनय सुदामे, शंभू घरडे, शैलेश जांभूळकर, सिध्दार्थ भोवते, हरिचंद्र धांडेकर, सुधा बनाफर, निशा पाचे, चंदा सिंगणधूपे, संगीता शेंडे, अनिता पटले, सुरेखा चव्हाण उपस्थित होते.
कास्ट्राईब महासंघाचे प्रश्न निकाली काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:50 AM
कास्ट्राईब महासंघाने कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलबिंत मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. बलकवडे यांनी महासंघाच्या मागण्यां व समस्या ऐकूण घेत त्या लवकरच निकाली काढण्याचे आश्वासन दिले.
ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : महासंघाच्या शिष्टमंडळाला आश्वासन