शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
2
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
3
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
4
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
5
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
6
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
7
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
9
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
10
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
11
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
13
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
14
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
15
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
16
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
17
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
19
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?

जिल्ह्यात संविधान दिन उत्साहात साजरा

By admin | Published: November 30, 2015 1:32 AM

भारतीय संविधानाचा ६७ वा वर्धापन दिन जिल्ह्यात ठिकठिकाणी थाटात साजरा करण्यात आला.

गोंदिया : भारतीय संविधानाचा ६७ वा वर्धापन दिन जिल्ह्यात ठिकठिकाणी थाटात साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालय तसेच विविध संघटनांकडून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जि.प. प्राथमिक शाळा बिरसी आमगाव : जि.प. प्राथमिक शाळा बिरसी येथे भारतीय संविधानाचा ६७ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. बिरसी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व संविधान वाचन करून संविधाना दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी सरपंच राजाराम राऊत यांच्या अध्यक्षतेत कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुष्पगुच्छ अर्पण करून पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक एल.यू.खोब्रागडे यांनी प्रास्ताविक मांडले. तद्नंतर बिरसीचे माजी सरपंच प्रल्हाद चौधरी यांनी संविधान राज्यघटनेचा मसुदा व स्वातंत्र्य समता-बंधुता यावर सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजकुमार चौधरी, माजी सरपंच पी.के. चौधरी, उपाध्यक्ष बबीता बिसेन, सदस्य सुरेश पटले, उईके, सुरेश चौधरी, धनवंता पटले, ममता पटले, विकास लंजे प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन अनिता मानकर यांनी केले. आभार वर्षा बावनथडे यांनी मानले.डॉ. भाभा विद्यालय झरपडा : अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एन.ए. नाकडे होते. प्रमुख अतिथी पर्यवेक्षक पी.एस. बारसागडे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आली. यामिनी वगारे हिने संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. यामिनी वगारे हिने संविधान दिनाचे महत्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नाकाडे व प्रमुख अतिथी पर्यवेक्षक बारसागडे यांनी संविधान दिनाचे महत्व स्पष्ट केले. पायल आरसोडे हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान विषयक भाषणाचे काही अंश सांगितले. संचालन डी.टी. मेश्राम यांनी केले. कार्यक्रमासाठी जी.पी. परशुरामकर, आर.एस. लंजे, एन.ए. कापगते, बी.एस. सार्वे, व्ही.एन. मस्के, आर.के. कापगते, एच.एस. इनवाते, शिक्षकेत्तर कर्मचारी आर.जी. बघेले, एस.पी. डेकाटे व एन.डी. मेश्राम यांनी सहकार्य केले. त्रिवेणी वरिष्ठ प्राथमिक शाळा गोंदिया : शाळा संचालक येशराम बडोले यांच्या अध्यक्षतेत संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका कमला कासारे यांनी बाबासाहेब आंबेडकरच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन पूजन केले. विद्यार्थ्यांद्वारे संविधानाचे वाचन करुन संविधानदिनानिमित्त रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमात सहा. शिक्षक नितीन बडोले, माया बाजळे, गीता लिल्हारे, निशा ठाकरे, राजेश पटले, हितेश पटले प्रामुख्याने उपस्थित होते. संचालक बडोले यांनी संविधानाच्या काही कलमाबद्दल माहिती देवून सम्पूर्ण देशाला संविधानाची अत्यंत गरज आहे. संविधानामुळे देशाचा विकास व ऐकता टिकून आहे असे विचार व्यक्त केले. आभार राजेश पटले यांनी मानले. भिमस्फूर्ती पुरुष व महिला मंडळ गोंदिया : सर्वप्रथम तथागत भगवान गौतमबुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह संविधान पुस्तिकेचे पूजन करण्यात आले.वंदनेनंतर या वॉर्डातील गल्ली नं.५ ला सम्राट अशोक मार्ग व मध्यभागी असलेल्या चौकाचे संविधान चौक असे नामाधिनाम देवून वॉर्डातील नगरपरिषद सदस्य मनोहर वालदे व आशा पाटील यांच्या हस्ते फलकाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. माधवराव कोटांगले, संविधानामुळे भारत देश सुरक्षित असल्याचे सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून बोरकर, चुन्नीलाल नांदगाये, विनित शहारे म्हणून उपस्थित होते.याप्रसंगी संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात स्वयंस्फूर्तीने संसदभवन दिल्ली व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र रांगोळीच्या माध्यमातून भारती, आरती टेंभुर्णीकर, रुपाली टेंभेकर, चेतन नांदगाये, निलेश जांभुळकर, चांदणी, स्वीटी रंगारी, हिमानी जांभुळकर या युवक-युवतींनी साकारले. कार्यक्रमासाठी वेदन साखरे, महेंद्र टेंभेकर, अशोक टेंभेकर, जयेंद्र रंगारी, राजेश गजभिये, विनय मेश्राम, मनोहर क्षीरसागर, छोटू भालाधरे, राजू नांदगाये, दिलवर टेंभुर्णे, सुरेंद्र सोनवाने, शेखर नंदेश्वर, बबलू खोब्रागडे, आकाश टेंभुर्णे, मिलिंद धमगाये, देवेंद्र जांभुळकर, ब्रजमोहन टेंभेकर, कमल बोम्बार्डे, उज्वल साखरे, परेष हस्ते, उमेश जांभुळकर, अजय टेंभुर्णीकर यांनी सहकार्य केले. संचालन शैलेष टेंभेकर व आभार रत्नदीप बडोले यांनी मानले. संत कबिर ज्यु. कॉलेज व हाय. शिवनी (गात्रा)दासगाव : जवळच्या संत कबिर ज्यु. कॉलेज व हायस्कुलमध्ये संविधान दिनाचा कार्यक्रम पार पडला.अध्यक्षस्थानी प्राचार्य रमेश तनवानी तर प्रमुख पाहुणे म्हणून सी.झेड. अंबादे, कालीदास सूर्यवंशी, जे.एल. बिसेन, एन.एल. मेश्राम, ए.के. उके उपस्थित होते. सर्वप्रथम पाहुण्यांनी घटनाकाराच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन दीप प्रज्वलीत केले. संविधानाच्या उद्देशिकेचे प्रास्ताविक कालीदास सूर्यवंशी यांनी केले. विद्यार्थ्यांमधून श्रृती मेश्राम, भाग्यश्री खोब्रागडे तर प्रा. सुनील पटले यांनी समायोचित भाषण केले. प्राचार्य तनवानी यांनी संविधानाचे महत्व विषद केले. संचालन गणेश बरडे यांनी केले. आभार बन्सोड यांनी मानले. कार्यक्रमासाठी ए.एन. महापात्र, रिता नंदागवळी, भारती लांजेवार, मुरकुटे, वासनिक बोपचे, नंदागवळी, लिल्हारे, श्रीभद्रे शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयीन तथा हायस्कुलचे विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने हजर होते. श्री तुकाराम हायस्कूल आमगाव : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य ए.डी. बिसेन होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. एस.के. मेश्राम, एम.एम. मेश्राम होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली.अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य बिसेन यांनी डॉ. आंबेडकराच्या जीवनाविषयी व कार्याविषयी माहिती दिली. तसेच प्रा. एच.के.मेश्राम यांनी भारतीय राज्य घटनेविषयी माहिती दिली. तसेच भारतीय समाज विविधतेने नटलेला आहे. भारतीय राज्य घटनेने या सर्व परंपराना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला असे सांगितले. तसेच प्रा. एम.एम. मेश्राम यांनी राज्यघटनेने प्रत्येक नागरिकांना समान अधिकार दिल्याचे सांगितले. त्याचबरोबर देश प्रति आपले काही कर्तव्य असतात. जी आपण सर्वांना पार पाडायची आहेत, असे मत व्यक्त केले. त्यानंतर प्राचार्य ए.डी. बिसेन यांनी उद्देश पत्रिकेचे वाच करुन सांगितले. कार्यक्रमासाठी प्रा. पी.पी. मेहरे, डी.बी. टेंभरे, एच.एस. खोटेले, जी.डी. पटले, एस.वाय. मेंढे, एच.एम. चौरे, वाय.पी. तरोणे, एस.डी. भवरीया, एम.के. सावसाके व सी.बानकर यांनी सहकार्य केले. संचालन विद्यार्थी पवन हुकरे यांनी तर आभार प्रा. डी.बी. टेंभरे यांनी मानले. प्रोग्रेसिव्ह स्कूल गोंदिया : प्रोग्रेसिव्ह शाळेत संविधान दिवस समारोह साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी पी.बी. भोसले सह.दिवानी न्यायाधिश (क-स्तर), प्रमुख पाहुणे पोलीस उप अधीक्षक व उपविभागीय अधिकारी आर.एच. राठोड, अ‍ॅड. टी.बी. कटरे, कैलास खंडेलवाल, आर.एस. सोनवाने, एन.आर. कटकवार, पी.आर. कटकवार, ओ.टी. रहांगडाले, आशा राव, कुमोदिनी तावाडे, निधी व्यास, विना कावडे, अभय गुरव, कृष्णा चव्हाण, विलास नागदेवे, असीम पशिने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतमाता व शारदा मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले. पाहुण्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी लिहिलेल्या संविधानावर मार्गदर्शन करताना संविधानातील प्रत्येक कलम ही लाख मोलाची असून त्याची प्रत्येक नागरिकांनी दखल घ्यायला हवी व त्याच मार्गाने पाऊल टाकावे. तसेच संस्थासचिव कटकवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकून त्यांच्या कार्यावर अभ्यास करण्याची सुचना दिली. आभार पर्यवेक्षक प्रमोद वाडी यांनी मानले. ग्रामपंचायत कार्यालय एकोडी एकोडी : कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला व इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन ग्रा.पं. कार्यालयात संविधान दिनाचा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सिंग होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील अ‍ॅड. नरेश शेंडे, सरपंच रवि पटले, घनश्याम पटले, नामदेव बिसेन, अजाब रिनाईत, टेकलाल चौधरी, माया तायवाडे, सविता राणे, ग्रा.पं. सदस्य पटले उपस्थित होते. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी अ‍ॅड. शेंडे यांनी भारतीय संविधानाची महत्ती सांगितली. राज्यघटनेची निर्मिती करून देश एकसंघ राहील असे महान कार्य केले. याप्रसंगी उपस्थितांपैकी अनेकांनी मार्गदर्शन केले. संचालन माजी उपसरपंच किरण मेश्राम यांनी केले. आभार ग्रा.पं. सदस्य अजाब रिनाईत यांनी मानले.जि.प. शाळा कोडेलोहारातिरोडा : महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष विनोद साखरे यांच्या अध्यक्षतेत जि.प. शाळा कोडेलोहारा येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच देवीका उईके, सुदाकर मेश्राम, मोहन उईके, जितेंद्र गौतम, पुरुषोत्तम वरखडे उपस्थित होते. याप्रसंगी मुख्याध्यापक दिलीप टेंभुर्णे यांनी शाळेला भारतीय संविधान भेट देवून सहायक शिक्षक संजय मडावी यांच्याकडून भारतीय संविधानाची शपथ सर्व विद्यार्थी व उपस्थितांना देवविली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक बिसेन, उदेलाल कोसरकर, संतोष रहांगडाले यांनी विशेष प्रयत्न केले. संजय गांधी हाय. व कनि. महाविद्यालय तेढा गोरेगाव : महाविद्यालयात प्राचार्य पी.एल. पंचभाई, सुशांत गोस्वामी, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमाप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रास्ताविकतेच्या प्रतिमेचे पूजन करुन मार्ल्यापण करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी बी.एन. बन्सोड यांनी भारतीय संविधानाचे महत्व, मुलभूत अधिकार, कर्तव्य, कलमे व परिशिष्टे यावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. प्रा. ओ.आय. रहांगडाले यांनी प्रास्ताविकतेचे वाचन करुन भारतीय संविधानाचे महत्व पटवून दिले.सदर कार्यक्रमासाठी प्रा. आर. के. धारगावे, डी.एम. तितरमारे, साखरे, कारंजेकर, विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने करण्यात आली.मनिभाई ईश्वरभाई पटेल हायस्कुल सोनी गोरेगाव : मनिभाई ईश्वरभाई पटेल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय सोनी येथे भारतीय संविधान दिन, समता व सामाजिक न्याय दिन तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अ‍ॅड. के.आर. शेंडे, प्राचार्य व्ही.टी. पटले तसेच पर्यवेक्षक आर.एच. डोमळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला थोर व्यक्तींच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. तद्नंतर कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे शब्दसुत्रनांनी तसेच पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. तद्नंतर कार्यक्रमाला उपस्थित अ‍ॅड. बोंबार्डे साहेब यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांनना सखोल मार्गदर्शन केले. तसेच शाळेचे प्राचार्य महोदयांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तद्नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष अ‍ॅड. के.आर. शेंडे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. संचालन सहा. शिक्षक बी.एल. कावळे यांनी केले. आभार एस.एस. शहारे यांनी मानले. जि.प. हायस्कूल, करटी (बु.) तिरोडा : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर.टी. बिसेन, प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक मांढरे उपस्थित होते. कार्यक्रमात शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. मांढरे, बन्सोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षांनी संविधानाचे महत्व विशद केले. कार्यक्रमात मुंबई हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे आभार राऊत यांनी केले.मानवता विद्यालय कवलेवाडा तिरोडा : भारतीय संविधान हे साधारणत: सर्व भारतीयांनी वाचायला हवे परंतु खेदाने म्हणावे लागते की हे संविधान एक टक्का नागरिकांनी वाचले नसावेत. भारताला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्ष लोटूनही अशी स्थिती आहे. वास्तविक पाहता संविधानात सर्व समस्याचे समाधाान प्राप्त होते असे मत पुण्याचे बार्टी येथील समतादूत किशोर मलेवार यांनी मानवता विद्यालय केसलवाडा येथील आयोजित कार्यक्रमात सांगितले.संविधान दिनाच्या कार्यक्रमानिमित्त समतादूत किशोर मलेवार यांच्या खास मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम प्राचार्य के.एम. बडवाईक यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक पी.डी. रामटेके, जे.आर. रिनाईत, व्ही.एल. घाटबांधे यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमात प्राचार्य व वक्त्यांनी संविधान व म. फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले. संचालन जी.के. खोब्रागडे, प्रास्ताविक पी.डी. बनकर व आभार एम.बी. पटले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. शहीद अवंती कनिष्ठ महाविद्यालय, कोटजमूरा सालेकसा : शहीद अवंती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी.आर. माहुले होते. यावेळी प्रामुख्याने व्ही.एम. मानकर, एस.ए. मोहारे, सी.बी. नागपुरे, एच.पी. बंसोड, जी.आर. कुराहे, एम.के. नागपुरे व इतर मान्यवर उपस्थित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला अभिवादन करीत पुष्पांजली वाहण्यात आली. तद्नंतर संविधान वाचन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य माहुले यांनी उपस्थितांना तसेच विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व पटवून संविधानात उल्लेखित अधिकार आणि कर्तव्याबद्दल माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय तिरोडा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात भारतीय संविधान दिनाचा वर्धापन दिन माजी आमदार भजनदास वैद्य यांच्या अध्यक्षतेत साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी माजी प्राचार्य व्ही.डी.मेश्राम, बी.व्ही.गोंडाणे होते. संचालन व आभार टी.एम.वैद्य यांनी केले. यावेळी प्रा. दिवाकर गेडाम, सुरेंद्र गेडाम, कृष्णा रामटेके, संचालक मंडळाचे सर्व सदस्य, कर्मचारी व बराच वाचकवर्ग उपस्थित होते. उल्हास पूर्व माध्यमिक शाळा धनेगाव दर्रेकसा : उल्हास पूर्व माध्यमिक शाळा धनेगाव संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊलाल पंधरे, मुख्याध्यापक एस.पी.कटरे, सहायक शिक्षक एम.बी.रत्नाकर, एम.पी.क्षिरसागर, पी. बी. रहांगडाले, एफ.टी.उपराडे, दुर्गा मोरघडे उपस्थित होते. गावात रॅली काढण्यात आली. आभार एम.पी.क्षीरसागर यांनी केले. मागासवर्गीय बहुउद्देशिय शिक्षण संस्था, रेंगेपारसालेकसा : खिलेश महाविद्यालय, एस.आर. बी. महिला महाविद्यालय, एस.आर.बी. कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तथा पूर्ति पब्लिक स्कुल सालेकसा यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिव राजेंद्र बडोले, प्रमुख अतिथी म्हणून प्रा. खुशाल एन. साखरे, भुषण एम. राऊत, महेंद्र वैद्य, शालिनी साखरे, महेश क्षीरसागर उपस्थित होते.प्रमुख अतिथींनी सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे विद्यार्थ्यांसमवेत वाचन केले. आपल्या भाषणात प्रमुख अतिथी प्रा. खुशाल साखरे यांनी भारतीय संविधानात अंर्तभूत, मुलभूत हक्क व कर्तव्य याची जाणीव विद्यार्थ्यांना करुन दिली. प्रमुख अतिथी भूषण राऊत यांनी भारतीय संविधानाचे महत्व विषद केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात राजेंद्र बडोले यांनी आपल्या दैनंदिन जीवनात संविधानाचे महत्व व संविधान निर्मात्यांचे, संविधान निर्मितीमागील उद्दीष्ट विषद केले.कार्यक्रमाच्या यश्स्वीतेसाठी अमित एस. बोरकर, पुनम ठाकरे, प्रशिक खोब्रागडे, देवेंद्र कांबळे, उके, सुरेखा युरी, ग्यानदास नागपुरे, सुभाष गोबाडे, सुजीत कोटांगले, उमेश डोये यांनी परिश्रम घेतले. संचालन अमित बोरकर यांनी तर आभार उके यांनी मानले.जि.प. कनिष्ठ महाविद्यालय, परसवाडातिरोडा : अध्यक्ष डॉ. पी.आर. लोंढे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून डी.एस. भगत होते. प्रथम बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उद्देश पत्रिकेचे वाचन विद्यार्थ्यांनी केले. संविधानाचे महत्व आर.आर. गजभिये यांनी पटवून दिले. अध्यक्षीय स्थानावरुन बोलताना डॉ. लोंढे म्हणाले की मानवी जीवन जगत असताना नियम पाळणे आवश्यक आहे. नाही तर मनुष्य स्वैराचारी बनतो. म्हणून जगत असताना नियम पाळणे बंधनकारक आहे. संविधानामध्ये राज्याच्या घटक सांगितले आहे. भूप्रदेश, लोकसंख्या, शासन हे घटक आहे. सार्वभौम म्हणजे सर्वोच्च सर्वात उच्च म्हणजे सार्वभौम. कुणाचाही अंकुश राहत नाही. अशी व्यवस्था म्हणजे सार्वभौम होय. समाजवादी व्यवस्थेत सार्वजनिक व शासकीय, धर्मनिरपेक्ष म्हणजे प्रत्येकाला आपआपल्या धर्माचे पालन करता येईल, अशी व्यवस्था म्हणजे धर्मनिरपेक्ष होय. प्रजासत्ताक म्हणजे लोकांनी लोकांसाठी, लोकांकरिता केले. राज्याच्या महत्वाच्या पदावर कोणत्याही धर्माचा व्यक्ती जाऊ शकतो. विचार, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्र अखंड ठेवणे.संचालन प्रा. दुधार व आभार प्रा. डी.व्ही. कवाने यांनी केले. जे.एम.व्ही. स्कूलगोंदिया : शाळेच्या मुख्याध्यापिका अमिता श्रीवास्तव यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेत संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी संविधान दिवस का साजरा करावा तसेच त्याचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच देशाचा विकास करण्यासाठी संविधानाचे ज्ञान असे आवश्यक असल्याचे सांगितले. याप्रसंगी शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मालतीदेवी जायस्वाल शाळागोंदिया : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णा राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून तांडेकर होते. याप्रसंगी विद्यार्थी व उपस्थित पालकांनी संविधान प्रास्तावीकेचे वाचन केले. पाहुण्यांनी संविधानाचे महत्व पटवून दिले. तर शाळेचे मुख्याध्यापक बी.डी.पटले यांनीही संविधानाचे महत्व पटवून दिले. संचालन सहायक शिक्षक एस.एल.हत्तीमारे यांनी केले. आभार डी.एस.ठाकूर यांनी मानले.