गोंदिया : भारतीय संविधानाचा ६७ वा वर्धापन दिन जिल्ह्यात ठिकठिकाणी थाटात साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालय तसेच विविध संघटनांकडून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाद्वारे संविधान दिवस साजरा करण्यात आला. तसेच २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे झालेले दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.अध्यक्षस्थानी शहर अध्यक्ष शिव शर्मा होते. पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे उपस्थित होते. याप्रसंगी सुशीला भालेराव यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले व भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी हरिणखेडे व शर्मा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार धर्मनिरपेक्षता व सर्वधर्मसमभाव या नितीवर चालण्याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी अर्बन बँकेचे अध्यक्ष महेश जैन, माजी नगराध्यक्ष आशा पाटील, लता रहांगडाले, पी.एस. फुले यांनी आपले विचार व्यक्त करीत बाबाहेबांच्या संविधानानुसार कार्य करण्याचा सल्ला दिला.संचालन जिल्हा प्रवक्ता अशोक शहारे यांनी केले. आभार रवी मुंदडा यांनी मानले. कार्यक्रमात गोपाल तिवारी, वामन गेडाम, इस्माईलभाई, गुड्डू बिसेन, प्रतिक भालेराव, गंगाराम कापसे, रवी मुंदडा, नानू मुदलियार, कृष्णकुमार जायस्वाल, अजाबराव रहांगडाले प्रामुख्याने उपस्थित होते. सभेच्या शेवती सर्व उपस्थितांनी बाबासाहेबांच्या संविधानाला अंगिकृत करण्याची प्रतिज्ञा घेतली. तसेच २६ नोव्हेंबर रोजी मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. मानवता पूर्व माध्यमिक शाळागोंदिया : मानवता पूर्व माध्यमिक शाळेत संविधान दिवस साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी.एफ. बालपांडे होते. प्रमुख पाहुणे म्हूणन एम.झेड. शेंडे, सी.एम. कटरे, एस.एस. रिनाईत, डी.एच. घरत, एस.पी. कोडापे, वी.एस. भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांनी लिहलेले भारतीय संविधान यांच्या प्रतिमेचा माल्यार्पण करुन दीप प्रज्वलन करुन झाली. यानंतर भारतीय संविधानाचे वाचन करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त एम.झेड. शेंडे यांनी संविधानाची प्रास्ताविकातून पार्श्वभूमी समजावून दिली. तसेच शाळेतील अनेक शिक्षकांनी सुद्धा संविधान दिवसानिमित्त मोलाचे मार्गदर्शन केले. तर शाळेतील काही विद्यार्थ्यांनी सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भाषणे व गीते गायली. संविधान दिवसानिमित्त शाळेत विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वाचन, लेखन, गायन, चित्रकला अशा अनेक प्रकारचे स्पर्धा घेण्यात आल्या.आदिलोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयगोरेगाव : श्रीे गुरुदेव आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदिलोक अध्यापक विद्यालय तसेच आदिलोक कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्तवतीने संविधान दिवसाचे औचित्य साधून संविधानाचे प्रास्ताविक सगळ्यांनी एकत्र वाचून तसेच संविधान दिवस साजरा केला. सदर कार्यक्रमाला आदिलोक अद्यापक विद्यालयाच्या प्राचार्य प्रा. मंजु रहांगडाले तसेच आदिलोक अद्यापक विद्यालयाचे प्राचार्य दीक्षित तसेच शरणागत, यु.जी. बिसेन, एस.डी. मेश्राम, सी.यू. पटले तसेच तुषार गेडाम ग्रंथपाल उपस्थित होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय वडेगाव : संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात भंते श्रद्धा राखंता तायवान (अरुणांचल प्रदेश) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन सामूहिक बुद्धवंदना घेतली. त्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. संचालन सतिश टेंभेकर यांनी केले. कार्यक्रमासाठी वाचनालयाचे अध्यक्ष शेखर मेश्राम, आदेश बडगे, डी.एस. बोदेले, रणविर कोटांगले, अजित बोदेले, सिद्धार्थ नंदेश्वर, ए.झेड. नंदेश्वर, सोनेवाने, सुधीर मेश्राम, अंबादे, संगीता वालदे, अमित बोदेले, राहुल वालदे, रिंकू नंदेश्वर, रसिक साखरे यांनी सहकार्य केले. ंंग्रामपंचायत सावरीगोंदिया : येथे विशेष ग्रामसभा घेवून भारतीय राज्यघटनेचे सामूहिकरित्या वाचन करण्यात आले. सरपंच डिलेश्वरी पटले व उपसरपंच नरेंद्र चिखलोंढे यांनी भारतीय राज्यघटना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला दीप प्रज्वलित करुन व माल्यार्पन करुन पूजा अर्चना केली. सोबत ग्रा.पं. पदाधिकारी व ग्रामस्थानी पूजा अर्चना केली. ग्रा.पं. सदस्य टेकचंद सिहारे यांनी संविधानावर प्रकाश टाकत गावकऱ्यांना संविधानाचे महत्व सांगितले. ग्रा.पं. सदस्य प्रेमचंद बिसेन यांनी संविधानाची स्तुती करुन आजचा दिवस इतिहास जमा असल्याचे म्हटले. कार्यक्रमाला सिताराम चिखलोंढे, लक्ष्मीकांत चिखलोंढे, वासुदेव डहाट, मयाराम हरिणखेडे, ईश्वर वडगाये, मीरा लामकासे, प्रभा शहारे, प्रेमलता चिखलोंढे, चंद्रप्रभा दमाहे, ठाकरे, बाबुलाल पटले उपस्थित होते. संचालन करून आभार ग्रामविकास अधिकारी के.एस. सेंदुरकर यांनी मानले.फुले-शाहू-आंबेडकर सार्वजनिक वाचनालय,टेमनीगोंदिया : वाचनालयात संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी नितेश गायधने व राजकुमार ठाकूर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षक नितेश गायधने यांनी संविधानाबद्दल विद्यार्थ्यांना संविधान आपल्या देशाची शान आहे. संविधान समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय यावर सुद्धा मार्गदर्शन केले. संचालन अविनाश मेश्राम यांनी केले. आभार नरेश परिहार यांनी मानले. यावेळी किशोर राऊत, आदित्य डोंगरे, स्वप्निल वंजारी, मंजित बन्सोड, अभिषेक मेश्राम, राजेंद्र परिहार, मनोज किरनापुरे, नरेश परिहार , संस्था सचिव शैलेंद्र डोंगरे, दीपक रहांगडाले उपस्थित होते. एस.एस.गर्ल्स कॉलेजगोंदिया : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एन.के. बहेकार होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. कळंबे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल राजश्री वाघ यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करुन झाली. अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. बहेकार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाविषयी व कार्याविषयी माहिती दिली. तसेच भारतीय राज्यघटने संबंधी माहिती दिली. त्यांनी सांगितले की भारतीय परंपरा ही विविधतेने संपन्न आहे व राज्यघटनेने या विविधतेला एकत्र बांधलेले आहे. भारत देशात प्रत्येक व्यक्तकी हा समान आहे. प्रा. कळंबे यांनी राज्यघटनेने प्रत्येक नागरिकांना समान अधिकार दिला आहे. त्याबरोबरच आपली देशाप्रति काही कर्तव्यही आहेत जी आ पण सर्वांना पार पाडायची आहेत असे मत व्यक्त केले. त्यानंतर डॉ. बहेकारांनी संविधान दिवसाच्या उद्देशिकेचे वाचन केले. त्यांना सर्व विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी साथ दिली. संचालन ग्रंथपाल, राजश्री वाघ यांनी केले. संचालनाच्या दरम्यान त्यांनी राज्यघटनेच्या लवचिकतेसंबंधी व तसेच आतापर्यंत झालेल्या संशोधनाविषयी थोडक्यात माहिती दिली. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थीनींनी सहकार्य केले. नवोदय हायस्कुल तथा कनिष्ठ महा., केशोरीकेशोरी : स्थानिक नवोदय हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या परिपत्रकातील सुचनेनुसार संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करुन संविधान दिवस साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य अशोक हलमारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक नरेंद्र काडगाये, प्रा. प्रकाश बोरकर, प्रा. रवि झिंगणजुडे, प्रा. हिवराज साखरे, प्रा. दिनेश नाकडे, ग्रा.पं. सदस्य मनोहर ठाकरे, देवीदास सार्वे, असुराज साखरवाडे, गजानन साळवे, सुखदास रहांगडाले, जागेश्वर मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. संविधानाबाबत जागृती होण्याच्या दृष्टीने गावामधून विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरच्या पूर्णाकृति पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी संविधानाबद्दलची माहिती प्राचार्य हलमारे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून दिली. प्रणय तिरपुडे या विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्व पटवून दिले. प्रास्ताविक प्रा. विवेक आंबेडारे यांनी मांडले. संचालन प्रा. मुरलीधर मानकर यांनी केले. आभार रजनी झोडे यांंनी मानले. छत्रपती शिवाजी संकुल देवरी : येथील छत्रपती शिवाजी संकुलातील छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्या मंदिर तथा हायस्कुल व कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिवसाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी कला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एम.जी. भुरे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर या दिवसाच्या समारंभाप्रसंगी उपदेश लाडे, प्राचार्य छत्रपती शिवाजी फार्मसी कॉलेज, जी.एम. काशिवार, मुख्याध्यापक छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्या मंदिर व समस्त कर्मचारीवृंदाच्या उपस्थित पार पडला. या दिवसाच्या विशेष महात्म्याविषयी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाविषयी विशेष माहिती कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून एस.जी. काशिवार यांना विद्यार्थ्यांना दिली. तसेच याप्रसंगी विद्यार्थ्यांनी अनेक रंगारंग कार्यक्रम सादर केले. आभार एस.व्ही. बोंदरे यांनी मानले.सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयअर्जुनी मोरगाव : भारतीय संविधानाची अंमलबजावणी देशात २६ जानेवारी १९५० पासून करण्यात आली. या संविधानाची निमिर्ती भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण करून ते देशाला अर्पण केले. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून घोषित करण्यात आला. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व न्याय या जीवन तत्वावर आधारीत भारतीय संविधानाच्ळा सन्मानार्थ सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त सामाजिक न्याय व समता वर्ष म्हणून घोषित करण्यात आल्याने संविधान दिनी जनजागृती करण्याच्या उद्देशाने गावामधून रॅली काढण्यात आली. रॅलीला प्राचार्य अनिलकुमार मंत्री यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. येथील प्रमुख मार्गावरुन संविधान जनजागृतीकरीत गावातील प्रमुख स्थळी चौकात संविधानाचे वाचन श्रद्धा चव्हाण, अंकिता गहाणे यांच्यासह सामूहिक वाचन विद्यार्थ्यांनी केले. याप्रसंगी संस्थासचिव तथा प्राचार्य अनिल मंत्री, हरिदास गहाणे, प्रा. रामदास सूर्यवंशी, सरिता शुक्ला, मुकेश शेंडे यांच्या हस्ते देवी सरस्वती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. संविधानाबद्दल सविस्तर माहिती सहा. शिक्षिका सी.एस. घाटे यांनी सांगितली. राष्ट्रीय सेवा योजना द्वारेही संविधान रॅलीत संविधान जनजागृती करण्यात आली. संचालन प्रा. इंद्रनिल काशीवार यांनी केले. जि.प. शाळा, दाभना अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील दाभना (अरततोंडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधान दिन साजरा करुन संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कार्तीकस्वामी सूर्यवंशी होते. अतिथी म्हणून सरपंच प्रभुदास प्रधान, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य रमेश प्रधान, दिलीप प्रधान, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मार्कंड रहेले, ग्रामपंचायत सदस्य टिकाराम भेंडारकर, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष अरविंद गोंडाणे, जया ताराम आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. यावेळी विद्यार्थ्यांना आपले हक्क कर्तव्य व अधिकार या विषयी माहिती देण्यात आली. सोबतच २६/११ च्या मुंबई येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन करून आभार सहायक शिक्षक किर्तीवर्धन मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका संध्या मते, सहायक शिक्षिका सुरेखा गिऱ्हेपुंजे यांनी सहकार्य केले. जिल्हा परिषद हायस्कूल सडक अर्जुनी : जिल्हा परिषद हायस्कुलमध्ये संविधान दिन थाटात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य ए.वाय. खान होते. अतिथी म्हणून केंद्रप्रमुख डी.टी. बावनकुडे, सी.ए. थेर, आर.एस. डोये, डब्ल्यू. एम. परशुरामकर उपस्थित होते. प्राचार्या खान यांच्या मार्गादर्शनात संविधानाची उद्देशिका याचे सामूहिक वाचन करण्यात आले. पश्चात जिल्हा परिषद हायस्कुल व जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान जनजागरण रॅली काढण्यात आली. दरम्यान भारतीय संविधान चिरायू हो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करण्यात आला. फेरीत प्रास्ताविकात्मक फलक, मूलभूत हक्क व कर्तव्य दर्शविणारे फलक होते. शालेय विद्यार्थ्यांची भिती पत्रक स्पर्धा घेण्यात आली. यात यशस्वी विद्यार्थ्यांना एक पेन भेट देण्यात आली. अध्यक्षीय भाषणातून संविधानाचा सविस्तर परिचय प्राचार्य खान यांनी करून दिला. तसेच विद्यार्थ्यांनी पायल, आचल व प्रतिक्षा यांनी लिहूनी घटना या भारताची सन्मान वाढविला. भीमाने माणूस घडविला हे गीत सादर केले. कार्यक्रमाला डी.पी. डोंगरवार, भीवगडे, दुधकणोज, कापगते, फंदे, येळेकर, गिऱ्हेपुंजे, चौधरी उपस्थित होते. प्रास्ताविक व संचालन अनिल मेश्राम यांनी केले. आभार आर.एस. डोये यांनी मानले. म्युनिसीपल गर्ल्स हायस्कूल गोंदिया : संविधान शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला असून यानिमित्त शाळेतील विद्यार्थिनींची रांगोळी व निबंध स्पर्धा घेण्यात आली. यासह विविध सामुहिक कार्यक्रमांचे आयोजन शाळेत करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापीका मुक्ता फुंडे यांनी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण केले. त्यानंतर सर्व शिक्षक, शिक्षिका, इतर कर्मचाऱ्यांनीही पूजन करून अभिवादन केले. दरम्यान विद्यार्थ्यांनी हिंदी, मराठी व इंग्रजीभाषेत संविधान वाचन केले. कार्यक्रमात शाळेतील शिक्षक बिसेन, नंदगडे व शहारे यांनी संविधानाचे महत्व विद्यार्थिनींना समजावून सांगीतले. तर शाळेच्या मुख्याध्यापीका फुंडे यांनी, संविधानाचा शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यांनी संविधानात सर्वांना समान हक्क देण्यात आल्याचे विद्यार्थ्यांना समजावून सांगीतले. पश्चात संविधान दिनानिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी व निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ग्रा.पं. शाळा व महाविद्यालय, इटखेडाइटखेडा : ग्रामपंचायत कार्यालय इसापूर, इटखेडा हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, स्वामी विवेकानंद विद्यालय व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, ज्ञान विकास वाचनालय व जि.प. प्राथमिक शाळेत संविधान दिनानिमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. इसापूर-इटखेडा हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी गावात मिरवणूक काढली. संविधान चिरायू हो च्या घोषणांनी ग्रामस्थांमध्ये भारतीय संविधानाबद्दल जनजागृती झाली. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून प्रशासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालये, शिक्षक-विद्यार्थी व पदाधिकाऱ्यांच्या मोठ्या उपस्थितीत संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. शुभारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन संस्था प्रमुखांनी विनम्र अभिवादन केले. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अस्मिता वैद्य, उपसरपंच वासुदेव उके, ग्रा.पं. सदस्य चेतन शेंडे, वसंत हटवार, शांता लांजेवार, कुंता कोकोडे, सुशिला गोंडाणे, दिप्ती कावळे, ग्रामविकास अधिकारी मेश्राम, तंमुस अध्यक्ष जगन गडपाल, आयुर्वेदिक दवाखान्याच्या डॉ.स्मिता बुद्धे, आरोग्य सेवक ब्राम्हणकर, आरोग्य सेविका, प्रितिसिंग, लक्ष्मी वलथरे, तृप्ती खंडाईत, इसापूर-इटखेडा हायस्कुलमध्ये ज्येष्ठ शिक्षक भुवन झोडे, बालाजी मस्के, पूर्णचंद्र धोटे, मंसाराम जांभुळकर, प्रा. सतपुरुष शहारे, प्रा. भगवंतराव फुलकटवार, पदमजा मेहेंदळे, पुरुषोत्तम राऊत, स्वामी विवेकानंद विद्यालयात प्राचार्य विश्वनाथ डांगे, जयप्रकाश मेश्राम, चेतन शेंडे, प्रा. अनिल भावे, देवराम चांदेवार यांनी कार्यक्रमासाठी योगदान दिले. (ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून )
जिल्ह्यात संविधान दिन उत्साहात
By admin | Published: November 28, 2015 2:59 AM