लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत स्थानिक केटीएस जिल्हा रुग्णालयात रविवारी जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे जागतिक काविळ दिन व मोफत हिपाटायटीस लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे यांच्या हस्ते जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.हिम्मत मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.या वेळी प्रामुख्याने निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज राऊत,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे, बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या प्रभारी अधीक्षिका डॉ.सुवर्णा हुबेकर, प्रसूती तज्ज्ञ डॉ.सायास केंद्रे,वरिष्ठ फिजीशियन डॉ.राजेंद्र वैद्य, मेट्रन नांदणे, एच.एन.चुटे, प्राचार्य शहारे, रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी अनिल गोंडाणे उपस्थित होते.जागतिक काविळ दिनाबाबत प्रभारी अधीक्षक डॉ.सुवर्णा हुबेकर यांनी माहिती दिली. बीजीडब्ल्यू रुग्णालयात दर मंगळवारी बाह्यरुग्ण बाह्यरुग्ण विभागात बालकांना मोफत काविळची लस दिली जाते. प्रतिबंध हाच एक उपचार असल्याचे सांगितले. डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी काविळ हा जीवघेणा आजार दूषित पाणी, अन्न यामुळे जास्त प्रमाणात होतो. पावसाळ्यात पाणी उकळून व निर्जंतुक करुन प्यावे. काविळचे लक्षणे दिसताच रक्त तपासणी करुन घ्यावी व वैद्यकीय तज्ञांमार्फत उपचार घ्यावेत.डॉ.राजेंद्र वैद्य यांनी हल्ली युवक-युवतींमध्ये अंगावर टॅटू नोंदवून घेण्याची फॅशन वाढत चालली आहे. परंतू त्यातूनही हिपाटायटीस बी पसरु शकतो.दूषित रक्त, दूषित सूया, इंजेक्शनमुळे देखील वायरल हिपायटायटीस बी होवून लिवर खराब होऊ शकते.त्यामुळे प्रत्येकाने हिपा-बी-लस टोचून घ्यावी. काविळ तर अॅलोपॅथीत उपचार नाहीत असा भ्रम समाजात पसरविला जातो परंतु ते चूक आहे. काविळचे निदान झाल्यावर तज्ञामार्फत त्वरित औषधोपचार घ्यावा, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये, अन्यथा जीवाला धोका होऊ शकतो.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हिम्मत मेश्राम यांनी लसीकरण ही बाळाची कवच कुंडले आहेत. त्यामुळे वेळापत्रकानुसार बाळाचे हिपा वायरस लसीकरण पूर्ण करुन घ्या. जागतिक काविळ दिनानिमित्त केटीएसमध्ये मोफत हिपाटायटीस लसीकरण कॅम्पचे आयोजन केले होते.एच.एन.चुटे यांच्या नेतृत्वात दिवसभर ११४ लोकांनी मोफत काविळची लस टोचून घेतली.कार्यक्रमाला शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राध्यापिका, केटीएसचा स्टॉफ व एएनएम विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
जागतिक काविळ दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 10:02 PM
राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत स्थानिक केटीएस जिल्हा रुग्णालयात रविवारी जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे जागतिक काविळ दिन व मोफत हिपाटायटीस लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्दे११४ जणांना दिली प्रतिबंधक लस : तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन